वसई- विरार, नालासोपार्यात जलप्रलय, केवळ अंगावरचे कपडे राहिले; अनेक ठिकाणी पूरस्थिती 400 लोक आडकले!
- Navnath Yewale
- 3 days ago
- 1 min read

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांसह राज्यात सर्व मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पण्यामुळे लोकलसह वाहतूक सेवा ठप्प झाली आहे . मुंबईजवळील वसईमध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. शिवाय पावसाच्या पाण्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक लाक अडकल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक लोक जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचेही समोर आले आहे.

400 लोक अडकले
वसई- विरार- नालासोपार्यापर्यंत मुसळधार पावसामुळे जलप्रकोप पहायला मिळत आहे. महापालिका आयुक्त आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्याकडून पूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली आहे. मागच्या 24 तासात 200 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक लोक पण्यात अडकले आहेत. सकाळपासून वसईतील मिठागराला पावसाच्या पाण्याने वेढा दिला असून आतमध्ये 100 कुटुंबातील 400 नागरिक अडकले आहेत. यातील काही नागरिकांना गळ्याइतक्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. पालिकेने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नालासोपार्यात जलप्रलय :
वसई-विरार - नालासोपार्यापर्यंत सर्वत्र पाणी साचल्याने अनेक रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. नालासोपारा पूर्व, आचोळा, तुळींज, सेंट्रलपार्क, स्टेशन परिसर, पश्चिम पठाणकर पार्क, श्रीप्रस्थ वसई सागरशेत, नवजीवन, विरार पश्चिम, विवा कॉलेज, युनिटेक कॉम्प्लेक्स हा सर्वच भागा पाण्याखाली गेला आहे.

वसईमध्ये रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप आल्याने पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळल्याने अपघात झाला आहे. यात मागे बसलेली महिला जोरात रस्त्यावर पडून जखमी झाली आहे. वसईच्या गिरीज गण नाका येथे ही घटना घडली. दरम्यान दुचाकिवरील महिला रस्त्यावर पडल्यानंतर पाठीमागून बस येत होती, मात्र सुदैवाने बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. वसई- विरार महापालिका हद्दीत सध्या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून त्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांचे अपघात होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
Comments