top of page

वसई-विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांना ईडीकडून अटक

ree

वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीने अटक केली आहे. यासोबत ईडीने महापालिकचे निलंबित नगर रचना उपसंचालक वायएस रेड्डी यांनाही ताब्यात घेतले आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि बेनामी संपत्ती सापडल्याच्या पुराव्यांमुळे अनिलकुमार पवार यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यांची चौकशी देखील झाली होती.


अनिलकुमार पवार यांच्या शासकीय निवास्थानी 29 जूलै 2025 रोजी ईडीने धाड टाकली होती. मुंबई, पुणे, नाशिक, सटाणा अशा एकूण 12 ठिाकणी ईडीने छापा मारला होता. पवार यांच्या निवास्थानावरून एक कोटी 33 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. सोबतच मोठ्या प्रमाणात कागदपत्रे हार्डडिस्क, नोतेवाई आणि बेनामी व्यक्तींच्या नावावर असलेली प्रॉप्रर्टी डॉक्यूमेंट्स, कॅश-चेक स्लिप्स आणि डिजिटल उपकरणे ईडीने ताब्यात घेतली होती. अनाधिकृत बांधकामात पवार प्रति चौरस फुट 20 ते 25 रुपये आकरत होते असा गंभीर खुलासा ईडीने केला होता.


वसई विरारमधील 41 बेकायदेशीर इमरतीच्या बांधकाम प्रकरणांमध्ये अनिलकुमार पवार यांंची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप झाला होता. शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकल्पांना अनिलकुमार पवार यांचा पाठिंबा असल्याचा संशय ईडीला होता. यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप देखील करण्यात आले होते.


नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरमध्ये कचरा डेपो आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे इमराती बांधण्यात आल्याचे उघड झाले होते. बोगस कागदपत्रं बनवून सदनिका सर्वसामान्यांना विकण्यात आल्या. लोकांची फसवणूक करण्यात आली. या घोटाळ्यामुळे तब्बल अडीच हजार कुटुंब बेघर झाली होती. या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात अनिलकुमार पवार सर्वात मोठे लाभार्थी असल्याचा संशय व्यक्त करण्यता आला होता.


Recent Posts

See All
बीड पुन्हा हादरलं; सरकारी वकिलाची न्यायालयात गळफास घेवून आत्महत्या

बीड, मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर बीड कायम चर्चेत राहिलं आहे. आज बीड जिल्ह्यातील वडवणी येथी प्रथमसत्र न्यायालयात एका...

 
 
 

Comments


bottom of page