वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मुंब्य्रमध्ये रेकी केली होती- बाळा बांगर
- Navnath Yewale
- Aug 3
- 1 min read

मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे. गोट्या गित्ते सायको किलर आहे. छोट्या गुन्ह्यापासून ते मोठ्या गुन्ह्यापर्यंत त्याचा हात आहे. गोट्या गित्तेला मकोकाखाली अटक करायला पाहिजे होती. मी सांगत होतो त्यावेळेला गोट्या परळीतच होता, असं अरोपी वाल्मिक कराडचे पूर्वीचे सहकारी बाळा बांगर म्हणाले. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आणि मकोका मधील फरार आरोपी गोट्या गित्ते याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर ही प्रतिक्रिया बांगर यांनी माध्यमांशी बोलातांना दिली आहे.
बाळा बांगर म्हणाले की, पोलिसांनी त्यावेळेला कारवाई केली नाही. आता किती वेळ पुढे निघून गेली आहे. तो व्हिडिओ व्हायरल करतोय आणि आपण पाहतोय. गोट्या गित्तेचं किर्तन ऐकायची वेळ आली. गोट्या गित्तने आणि वाल्मिक कराडच्या तांदळे नामक गुंडोन सुरेश धस, बाळा बांगर, जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, गोट्या गित्ते आणि तांदळे नामक गुंडाने मागच्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मुंब्र्यामध्ये जाऊन रेकी केली होती वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार. गोट्या गित्ते लोकांना मारायच्या अगोदर फोन करून धमक्या देऊन सांगायचा. परळी पोलिसांना का प्रिय आहे गोट्या गित्ते ? रस्ता रोको आंदोलनाला तुम्ही यायचं नाही आलात तर आमच्याशी गाठ आहे अशी फोनवरून श्री कराडच्या बॉडिगार्डने मला धमकी दिली.
हे मी परळीत सांगितल्यांनतर कन्हेरवाडी आणि परळीतील लोकांना वाल्या कराडच्या घरावर अटॅक केला. हे परळी पोलिसांनी अंधारात ठेवलं. वाल्मिक कराडचे पोरं आणि बॉडीगार्ड घरात लपून बसले होते. वाल्या कराडचं काय राहिलं? त्याच्या घरात घुसले परळीतले लोकं. श्री कराड मला प्राथमिक माहिती भेटली त्यानुसार भूटान, नेपाळ देशातून बाहेर देशात पालयन करायच्या प्रयत्नात आहे. पंकज कुमावत हे श्री कराड आणि वाल्या कराडच्या टोळीला पाताळातून पण शोधून काढतील परळीतल्या घरा-घरात माहित आहे महादेव मुंडे यांची हत्या कोणी केली? असंही बाळा बांगर यावेळी म्हणाले.



Comments