विकृत खरात प्रकरणावरून दोन महिला नेत्यांत जूंपली? शितल म्हात्रे-सुषमा अंधारे यांच्यात ट्विटरवॉर
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

मुंबई : नाशिकच्या विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तपाले आहे. खरात प्रकरणावरुन राज्याच्या राजकारण ढवळून निघाले असताना रोज नवनव्या खुलाशांमुळे राजकारणाला हादरे बसत आहेत. विधिमंडळ अधिवेशनावेळी या प्रकरणावरुन सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरेाप- प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यामुळे तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या सरकारलाही पाणी दिल्याच्या मुद्यावरून धारेवर धरले जात आहे. त्यावरुनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे व शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे या महिला नेत्यांत चांगलीच जुंपली आहे. म्हात्रे यांनी ट्विट करत थेट ठाकरे कुटुंबीयांना लक्ष्य केले. त्यामुळे सुषमा अंधारेंनी म्हात्रेंवर पलटवार केला आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंनी खरात प्रकरणावरुन ‘ताज’ का राज, ताज हॉटेलमध्ये बैठक कोणाची झाली असा सवाल केला आहे. अशोक खरातला कोणी ही पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हण.. यही तो नाही ‘ताज’ का राज? अस असा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असं ट्विट शितल म्हात्रेंनी केले.
दरम्यान, शितल म्हात्रे यांच्या ट्विटला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले आहे. आहो विषय भरकटवू नका. आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत. बाय दवे तुमचा व्हिडिओ मॉर्फ केेलाय असे तुम्ही म्हणाला होतात. तोच तो सुर्वे प्रकरणातला, त्यातला नेमका ओरिजनल व्हिडिओ सापडला का? असा सवाल अंधारे यांनी म्हात्रेंना उद्देशून केला. त्यावर, म्हात्रेंनीही पत्यूत्तर दिलं आहे.
प्रत्यूत्तरा दाखल म्हात्रे म्हणतात की, सुषमाताई, मूळ विषय हा ताजमध्ये झालेल्या मिटिंगचा आहे. त्यामुळे उगाच इकडे तिकडे उड्या मारू नका. खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताजमध्ये कोणी बैठक घेतली हाती? त्यासाठी मध्यस्थी करणारा नेता कोण होता? पाईपालाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमने आदेश दिला होता की नाही? त्यामागे कुठली न्यूमरॉलॉजी होती? याची चर्चा व्हायला पाहिजे ना ताई?, असे शितल म्हात्रें म्हणाल्या.
त्यासोबतच ताई, त्यावेळी तुम्ही शिवसेनेत नव्हत्या, वंदनीय बाळासाहेबांना शिव्याशाप देण्यात आणि उबाठा व आदूबाळाला दहीहेंडीच्या थरावर चढवण्यात मग्न होत्या. त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्यामुळे ज्यांच्या आदेशाने तुम्ही ही टीवटीव करत आहात त्यांना जाऊन विचारा ‘ताज का राजश’ असेही म्हात्रें म्हणाल्या.



Comments