विकृत खरातच्या दाव्याने खळबळ , अंनिसचा तपासाची दिशाभरकटवण्याचा संशय
- Navnath Yewale
- Mar 29
- 1 min read

कथीत भोंदूबाबा अशोक खरपात याच्या एका स्टेटमेंटमुळे तपासात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. अशो खरात आणि निीर जाधव यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असून. यावेळी खरात याने नीरज जाधव याच्याबाबत खळबळ जनक दावा केला आहे. या तपासाला आणखी वेगळी दिशा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्य संशयित भोंदू अशो खरात आणि नीजर जाधव यांची समोरासमोर चौकशी झाली. खरात याच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम केलेल्या नीरज जाधव याच्या समोरा समोरच्या चौकशीत अशोक खरात म्हणाल की, नीरज जाधवला कोणीतरी पूर्वनियोजीत कट रचून माझ्याकडे ‘ ऑफिस बॉय’ म्हणून पाठवले आहे. तो स्वत:हून आलेला नाही, असा खळबळजनक दावा अशोक खरातने पोलिस अधिकारी यांच्यासमोर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खरातच्या या दाव्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीरज जाधव हा एका वर्तमाणपत्रात आलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून खरातच्या कार्यालयात अत्यंत कमी पगारावर कामाला लागला होता. सन 2019 ते 2024 या काळात नीरज जाधव हा खरात याच्याकडे कामाला होता. मात्र, आपल्याकडे कामाला असलेल्या नीरज जाधव यामागे खरातने आता ‘ कट’ असल्याचा संशय व्यक्त केल्याने यामागे तिसरी व्यक्ती कार्यरत आहे का? याचा तपास एसआयटीला करावा लागणार आहे.
दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मुङन समितीने यात उडी घेतली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्यांनी खरातचा हा दावा फेटाळून लावला आहे. तपासाची दिशा भरकटवण्यासाठीच खरातने हा बनाव रचला असावा, असा संशय अंनिसने व्यक्त केला आहे. “ नीरज जाधवच्या आधी येथे काम करणार्या 10 ऑफिस बॉयनी काम का सोडले? असा सवाल उपस्थित करत, त्या सर्व जुन्या 10 कर्मचार्यांची देखील सखोल चौकशी करण्याची मागणी अंनिसने लावून धरली आहे.



Comments