विद्यार्थी आंदोलनावरुन कराळे गुरूजीं विरोधी पक्षावर भडकले; काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंना महाराष्ट्र सदनात...
- Navnath Yewale
- 5 hours ago
- 2 min read

नवी दिल्ली: जंतरमंतरवरील आंदोलनावर पोलिसांच्या लाठीचार्जवर संताप व्यक्त करत नितेश कराळे गुरूजी विरोधी पक्षांवर प्रचंड संतापले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी आंदोलनात सहभाग का घेतला नाही असा जाब विचारत कराळे गुरुजी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर भडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोज जनता पार्टीच्या वतिने गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोकवारी (दि.20) संसदेवर मोर्चात पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईचा देशभरातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता वर्धातील नितेश कराळे गुरूजींनी आंदोलनामध्ये सहभागी होत विरोधपक्षावर आक्रमक झाले.
इंडिया अलायंसच्या खासदाराच्या आंदोलनामध्ये अनुपस्थितीवरुन कराळे गुरुजीं महाराष्ट्र सदन येथे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर चांगलेच भडकले. संसदेवरील मोर्चामध्ये इंडिया अलायंस च्या खासदारांनी सहभाग घेतला असता तर, मोदी-शहा विमानाने बाहेर देशात पळाले असते एवढा तरुण रस्त्यावर असताना विरोधी पक्षाचे खासदार संसदेमध्ये काय करत होते? राहुल गांधी मोर्चात का नाही सहभागी झाले, विरोधी पक्षांच्या शंभर खासदारांनी आंदोलनात सहभाग घेतला असता तर लाठीचार्ज झाला नसता आणि सत्ता पालट झाली असती असं वातावरण होतं, तुम्ही विरोधी पक्षात आहात याचं भान ठेवा म्हणत कराळे गुरूजींनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना जाब विचारला.
तीस दिवस झाले आंदोलन सुरू आहे, पण सगळ्याच विरोधी पक्षातील लोक आंदोलनाकडे आले नाहीत, केवळ फोटो सेशन करण्यासाठी येत होते. काल आंदोलन होतं, मग कालाचा आणि आजचा दिवस महत्वाचा होता. एवढं मोठं आंदोलन सुरू आहे, ते पोरांना आंदोलनाची माहिती नाही कसं करायचं ते, बसता काय तिथं चोवीस लोकं उपाशी तपाशी बसून आहेत. तुम्हाला लाज शरम नाहीत आपोझिशन लोकांना, सालं मस्तकात तळपायची आग पोचयली समदी. राहुल गांधींना आंदोलनात यायला काय झालं होतं, आंदोलनाचं नेतृत्व करायला हवं होतं, पंन्नास खासदार घेवून. माणिकराव ठाकरे राहुल गांधी येतील म्हटल्यावर कराळे गुरूजी म्हटले आता कधी मेल्यावर येणार आहेत का? असा प्रश्न विचारला.
त्यावर माणिकराव ठाकरे म्हणाले की तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगा यायला यावर चिडून निलेश कराळे गुरूजी म्हणाले माझा पक्ष xxx गेला, xxxx गिनत नाही मी, इथं एवढा अन्याय होऊ राहिला 22 पोरांनी आत्महत्या केल्या. कोणत्याही सभा घेता येता राहुल गांधींना, यावं तर लागेल आमच्या पक्षाचे तिथे,छी xxx भो xxx चे . यावर माणिकराव ठाकरे म्हणाले हा रोष बीजेपीच्या विरोधात हवा. त्यावर कराळे गुरूजी म्हणाले बीजेपीच्या विरोधातच आहे, पण तुम्ही आपोझिशन पार्टीत आहात ना, तुम्ही जर संसदेचं सभागृह सोडून आंदोलनात सहभागी झाले असते तर सत्ता बदलली आज सत्ता असं म्हणत माणिकराव ठाकरे यांना जाब विचारल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.



Comments