top of page

नीट पेपरफुटीवरुन विरोधीपक्ष आक्रमक; राहुल गांधीचा प्रधानमंत्री निवासस्थानासमोर तीन तास ठिय्या , पोलिसांकडून धरपकड

Jul 22
2 min read

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरुन केंद्र सरकारविरोधात काँग्रसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर राहुलगांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या खासदारांनी तब्बल तिन तास ठिय्या आंदेालन करण्यात आले. पोलिसांनी काँग्रेसचे नेत तथा लोकसभाचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, अखिलेश यादव, यांना ताब्यात घेतले.


नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी संसदेकडे मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने देशभरात या मुद्यावर राजकीय वातावरण तापले आहे.


दरम्यान, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संसदेत सविस्तर चर्चा घ्यावी, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार प्रकरणाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन करावे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा ततडीने राजीनामा घ्यावा, संसदेतील चर्चेदरम्यान संबंधित गृहसचिव उपस्थित रहावेत, आंदोलकांवरील लाठीमाराची न्यायालयीन किवां स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राहुल गांधींनी प्रधानमंत्री निवासस्थानासमारे ठिय्या मांडला.


नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच निवासस्थान गाठल्यामुळे एकच खळबळ उडाली. पंतप्रधानांच्या घराबाहेर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षातील खासदारांनी तीन तास ठिय्या मांडला. हाताला बांधून घेत आम्हालाही अटक करा, असं म्हणत राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार प्रियांका गांधी, मलिकार्जुन खरगे, यांच्यासह काँग्रसचे अनेक खासदार या आंदोलनात सहभागी झाले. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, रणदिपसिंह सुरजेवाला यांच्यासह अने दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनात विरोधी पक्षांच्या नेत्यांचा सहभाग महत्वाचा ठरला.


पोलिसांनी घेतलं ताब्यात: कंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधीशी दोन- तीन वेळा संवाद साधला. संसदेत विद्यार्थ्यांच्या मंद्यावर चर्चा करण्याचे अश्वासन मिळाल्यास धरणे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती आपण राहुल गांधींकडे केल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यानंतर पोलिसांची एंट्री झाली. एका बसमध्ये सगळ्या नेत्यांना बसवण्यात आलं. यावेळी पोलिस आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये झटापट झाली. या झटापटीमध्ये राहुल गांधी यांना किरकोळ दुखापत झाली. एका बसमधून सर्व नेत्यांना दिल्लीतील मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर ही घडमोड घडली असून कायदेशीर प्रक्रियेनंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी सोडून दिलं.

Comments


bottom of page