विधानसभा निवडणुकीच्या निकालाचेच आकडे मशिनमध्ये सेट ! तेच आकडे.. त्याच मशिन.. तोच पैसा, किमान आकडे तरी बदलायला पाहिजे होते -संजय राऊत
- Navnath Yewale
- Dec 21, 2025
- 1 min read

राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील सर्वाधिक नगरपरिषद, नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. याशिवाय बावनकुळे यांनी निकालाच्या आगोदर केलेल्या वक्तव्यानुसार कधी नव्हे त्या जागांवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. आणि घडलेही तसेच अद्यापर्यंत खातंही उघडू न शकणार्या ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या निकालांवरून शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
विधानसभा निवडणुकांप्रमाणेच राज्यात नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महायुतील पुन्हा एकदा अभूतपुर्व यश मिळालं आहे. महाविकास आघाडीला पुन्हा मोजक्या जागांवर समाधान मानावं लागत असल्याचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालावर शिवसेना (उबाठ) पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका करत गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहिली असतील तर तेच आकडे आहेत मशिनही तसीच सेट आहे 120 ते 125 भारतीय जनता पक्ष, 54 महाविकास आघाडी आणि 40 ते 42 अजित पवार आकडे तेच आहेत ना?. त्याच मशिन.. तेच सेटींग कायम आणि तोच पैसा ही आपली लोकशाही आहे. तुम्ही आकडे पहा ना, आकडमध्ये आजिबात बदल झालेला नाही त्यांच्या. भारतीय जनता पक्षानं मशिन त्याच पद्धतीनं फिट केल्या, तेच आकडे रहायला पाहिजेत. किमान आकडे तरी बदलायला पाहिजेत असा सवाल करत राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राऊत यांच्या आरोपाला भाजप काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.



Comments