विरोधी पक्षनेता नेमण्याचे काम आमचे नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Navnath Yewale
- 9 hours ago
- 1 min read

नागपूर: राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन यंदा चांगलच गाजलं आहे. अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चांगलाच तपाला आहे. राज्याला सध्या विरोधी पक्षनेता नाही. सरकारकडे पाशवी बहूमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे. अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम होतो. यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकाराचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. शेतकर्यांची कर्जमाफी न करणार्या आणि विरोधी पक्षनेता न निवडणार्या सरकारच्या चहापानासाठी का जावं असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. विधीमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही अशी इतिहासात पहिल्यांदाच वेळ आली आहे. यावर देवंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासंदर्भात सभापती आणि अध्यक्ष निर्णय घेतील. आत्ताच विरोधी पक्ष दिशाहीन आहे.
विरोधी पक्षावर कुणावरही विश्वास राहिला नाही. विरोधक पायर्यावर आंदोलन करण्यात धन्यता मानत आहेत. विरोधकांकडे सध्या कोणताही मुद्दा नाही. विरोधी पक्षनेत्यांसदर्भात सभापती आणि अध्यक्ष निर्णय घेतील. तो निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. तो अधिकार सरकारचा नसून अध्यक्ष आणि सभापतींचा आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे.
संविधानिक संस्थांवर विरोधकांची आगपाखड करत आहे. राज्य दिवाळखोर आहे हे दाखवण्याची विरोधकांना घाई लागली आहे. राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची पण दिवाळखोरीकडे वाटचाल नाही. इतर राज्यांच्या तुलनेत राज्य सक्षम असून योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सक्षम असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.



Comments