top of page

विशेष प्रतिबंधक न्यायालयाचा एकनाथ खडसेंना दणका; भोसरी जमीन व्यवहार प्रकरण

ree

पुणे : लाचलुचपत विशेष प्रतिबंधक न्यायालयाने एकनाथ खडसेंना मोठा दणका दिला आहे. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आरोपातून मुक्तत करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयात केली होती. मात्र ही मागणी विशेष न्यायालयाने नामंजूर करून त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.


लाचलुचपत विभागाने दाखल केलेले 1988 च्या कायद्यामधील तरतुदीनुसार दोषारोप दाखल करण्यास पुरावा असल्याचे मत न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यासंच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अंतर्गत कायद्याचा फास आणखी आवळला जाणार आहे.


तसेच शासनाच्या विविध विभागाने देखील एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून केलेला व्यवहार दिसून येत असल्यामुळे न्यायालयाने शासनावरही ताशेरे ओढले आहेत. त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयात चौकशी सुरू राहणार आहे.


काय आहे प्रकरण: भोसरी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे सर्व्हे नंबर 52/2ए/2 अंतर्गत असलेल्या जमिनीची खरेदी करून त्या जमिनी बाबत भरपाई मिळवण्याचा प्रयत्न केला. ही जमीन उकाणी कुटुंबाच्या मालकीची होती मात्र या जमिनीमध्ये वादग्रस्त प्रकरण निर्माण करून हि जमीन वादादीत असताना खडसे कुटुंबीयांनी खरेदी केली. एकनाथ खडसे राज्याचे महसूलमंत्री असताना पदाचा गैरवापर करून हि जमीन पत्नी जावई मार्फत एमआयडीसी साठी संपादित केली.

Comments


bottom of page