top of page

व्हिएसआर कंपनीला मोठ्या राजकीय नेत्याचा पाठिंबा - रोहित पवार

केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी; मोदी-शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात

नवी दिल्ली: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले होते. मात्र, हा विमान अपघात घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदां घेवून व्यक्त केला होता. त्यानंतर आज शनिवार (दि.21) रोहित पवारांनी पुन्हा दिल्लीत पत्रकार परिष घेत केंद्रीय मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी करत अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लक्ष घालून हा विषय मांडला पाहिजे, असेही रोहित पवार म्हणाले. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.


दिल्लीतील विविध माध्यम प्रतिनिधींशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “ व्हिएसआर कंपनीच्या मागे मोठे लोक असून, त्यांच्याकडून कंपनीला वाचवले जात आहे. व्हिएसआर कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा घेतला पाहिजे. याप्रकरणी आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले. पण त्याला ते सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाहीत. आम्ही माहिती मागितली की, आम्हाला भाजपवाले सोशल मिडियावर ट्रोल करत आहेत. अजितदादांच्या अपघातानंतर लोकांच्या मनात अनेक शंका आहेत त्याचे निरसन झाले पाहिजे” असं रोहित पवार यावेळी म्हणाले.


पुढे बोलताना ते म्हणाले की, “ आमच्या पातळीवर आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत. दादांवर प्रेम करणार्‍या लोकांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले मात्र ते दिले गेले नाही. तपासकर्त्यांकडे ती माहिती आहे की नाही हे माहित नाही. सीआयडीने देखील एकही रिपोर्ट दिलेला नाही. सरकारच्या माध्यमातून माहिती मिळालेली नाही. पण आमच्या ट्रोलर्सना भाजप पुरस्कृत ट्रोलर्सना एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीच्या माध्यमातून सहज मिळते” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Comments


bottom of page