(व्हिडिओ): महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरच्या नव्या व्हिडिओने खळबळ; महाराष्ट्रात राजकीय भूकंप, सह आरोपी करण्याची मागणी
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 3 min read

नाशिक : नाशिक येथील वदग्रस्त बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्यावरील गंभर गैरवर्तणूक आणि लैंगिक अत्याच्याराच्या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. यसा प्रकरणाचे धागेदोरे अनेक मातब्बर राजकीय व्यक्तींशी जोडले जात असल्याची चर्चा असतानाच, आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत झाला आहे. या नव्या व्हिडिओमुळे त्यांच्यावरील अडचणीत मोठी भर पडली असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये रूपाली चाकणकर या अशोक खरात याच्यासमोर उभ्या राहून त्याचे तोंडभरून कौतुक आणि आभार व्यक्त करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात की , “जन्म देणारी आई आणि चालायला-बोलायला शिकवणारे वडील हे माझे गुरू आहेत. मात्र, माझा जन्म नेमका कशासाठी झाला आहे आणि मला आयुष्यात काय साध्य करायचे आहे, हे सांगणारे तुम्ही माझे ‘गुरूमाऊली’ आहात. आज मी रूपाली चाकणकर म्हणून ते काही कार्य करत आहे आणि माझे जे काही अस्तित्व आहे, ते केवळ तुमच्यामुळेच आहे.” विशेष म्हणजे पाद्यपूजा करतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
या सर्व प्रकारानंतर त्यांच्या स्वपक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत आपल्याच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांवर थेट निशाणा साधला आहे. अशोक खरात याच्या सर्व अनैतिक आणि चुकीच्या कृत्यांची पूर्ण माहिती असतानाही त्याल जाणीवपूर्वक पाठीशी घातल्याचा मोठा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याच कारणास्तव रूपाली चाकणकर यांना या गंभीर गुन्ह्यामध्ये थेट सह- आरोपी करण्यात यावे, अशी थेट मागणी अॅड. रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. “ जर महिला ओयागाच्या अध्यक्षाच अशा भोंदू बाबांना अभय देत असतील आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहत असतील, तर मग पीडित महिलांनी न्यायासाठी कोणाकडे जायचे “ ? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्राची एपस्टिन फाईल असे नाव दिले आहे. “ एका विकृत प्रवृत्तीच्या माणसाने महिला आयोगाच्या अध्यक्षांनी असे पाय धुणे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणी आणि संतापजनक बाब आहे” अशी सडकून टीका सुुषमा अंधरो यांनी केली आहे.
दरम्यान, नाशिक पोलिसांच्या तपासादरम्यान अने धक्कादायक व्हिडिओ हाती लागले आहेत. त्यामुळे आता या व्हिडिओमधील संवादांची तसेच अशोक खरात आणि इतरांशी असलेल्या आर्थिक किंवा संस्थात्मक लागेबांध्याची सखोल चौकशी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय अशोक खरात याच्यवा शिवनिका ट्रस्ट या संस्थेमध्ये रूपाली चाकणकर यांचे नाव संचालक म्हणून नोंदवले गेल्याचा मोठा आरोपही झाला असून नाशिक पोलिस सध्या या सर्व बाबींची अत्यंत बारकाईने पडताळणी करत आहेत.
हे प्रकरण केवळ एका भोंदू बाबाच्या गैरकृत्यांपुरते मर्यादित नसून, यात राजकीय नेत्यांचा आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणार्या सर्वोच्च पदावरील व्यक्तींचा सहभाग असणे हे समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे. सखोल आणि निष्पक्ष चौकशीतूनच यातील सत्य जनतेसमोर यायला हवे आणि अशा प्रकरणांमध्ये कुणालाही पाठीशी न घातलता योग्य ती कायेदशीर कारवाई व्हायला हवी,अशा भावना स्थानिक पत्रकार दत्तात्रय खेमनकर यांनी व्यक्त केल्या.
रूपाली चाकणकर फरार : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा निष्पक्ष तपास होवून सत्य जनतेसमोर आणण्यासाठी त्याची पाद्यपूजा, त्याच्या डोक्यावर छत्री धरणे असो की त्याचे औक्षण करणे असो महिला आयोगाच्या अध्यक्षाला हे शोभनिय नाही. एका संविधानीक पदावर असताना चाकरणकर यांनी भोंदू बाबाची पाद्यपूजा केली, त्याला केक भरवला, त्याच्या डोक्यावर छत्री पकडली असे एक- एक फोटो,व्हिडिओ समोर येत आहेत. याशिवाय भोंदू बाबाच्या ट्रस्टच्या त्या संचिलिका आहेत त्यामुळे या प्रकरणात चाकणकर निश्चित आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून पोलिसांवर दबाव आणून पुरावे नष्ट करतील त्यासाठी तात्काळ त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी चाकणकर यांच्याच पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गट च्या नेत्या रूपाली ठोंबर यांनी केली होती. आज त्यांच्या फेसबूक पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. रूपाली ठोंबर पाटील यांनी फेसबुकवर “ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर फरार. बाजव टाली.” अशी पोस्ट केली आहे.



Comments