top of page

शरद पवारांच्या खासदाराचा अजित दादांसोबत हेलिकॉप्टर प्रवास?


बीड: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आज बीड दौर्‍यावर होते. शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशासकीय दौर्‍यामध्ये नियोजित कामे आटोपून उपमुख्यमंत्री पवार हेलीकॉप्टरद्वारे पुण्याकडे रवाना झाले. विशेष म्हणजे बीडचे खासदार बजरंग सोणवने अजित दादांसोबत हेलिकॉप्टरने रवाना झाल्याने चर्चांना उधान आले आहे.


राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकांची निवडणुक सुरू असून लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणुक जाहीर होणार आहे. महानगर पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर पुणे, पिंपरी चिंचवड यासह बहूतांश ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोणवने हे आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका हेलिकॉप्टरने प्रवासात दिसून आल्याने जिल्ह्यातील जानकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे मंत्रीपदाची संधी हूकल्याने धनंजय मुंडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि मुंडे विरोधकांची अजित दादांशी जवळीक जिल्ह्याचे राजकीय समीकरणं बदलणारे ठरणार? असा कयास बांधला जात आहे.



कार्यक्रम सुरू असताना अजित दादांनी धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, नमिता मुंदडा यांच्या नामोल्लेख करत त्यांच्या अनुपस्थितीची कारणमिमांस सांगितली. मात्र, कार्यक्रम आटोपून खासदार बजरंग सोनवणे यांना सोबत घेवून हेलिकॉप्टरने रवाना झाल्याने जिल्ह्यात चर्चांना उधान आले आहे. दोन वेळा मंत्रीपदाची संधी हुकल्यानंतर काहीसे अस्वस्थ असलेले आमदार धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच आज खासदार बजरंग सोणवने यांची अजित पवारांशी जवळीक आगामी निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचे संकेत तर नाहीत ना? हे येणार्‍या कालावधीत स्पष्ट होणार असले तरी तुर्तास मात्र चर्चांचे सुरू झाले आहे.

Comments


bottom of page