top of page

शिंदे सेनेच्या बैठकीत मंत्री,आमदारांची नाराजी भाजपकडून गळचेपी, दुय्यम वागणूक;..तर आम्ही राजीनामा देऊ

Mar 23
1 min read

मुंबई: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकीवरून शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधीमडळात पोलिस अधिक्षकांवर गंभीर आरोप केले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.


अधिवेशनात सातारा निवडणुकीचे पडसाद उमटल्यानंतर भाजपचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झाली.


तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दालनातही शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका मांडली. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारी आहे. आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर बालून दाखवली. सातत्याने आमची गळचेपी होत असल्याने यावर आता बोललं पाहिजे असेही आमदार आणि मंत्री यावेळी म्हणाले.


दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवरून मंत्री शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यानंतर सातार्‍याचे एसपी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर त्या दिवशीच्या घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज मागवावे, त्याचे फुटेज माध्यमांकडे असू शकतात, असे निर्देश शंभूराज देसाई यांच्या तक्रारीनंतर गोर्‍हे यांनी दिले.

Comments


bottom of page