top of page

‘शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद शिवसेना पुरस्कृत सिद्धेश कदम फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम; मुंबईत जनसेवेचा नवा उपक्रम २५ हजारांहून अधिक नागरिकांना थेट लाभ

सुट्टीचा वार बनवला ‘सेवेचा वार’

७ जून ते २८ जून दरम्यान सलग ४ रविवारी मुंबईतील विविध मतदारसंघामध्ये महाशिबीराचा धडाका!

सुट्टी न घेता, प्रत्येक रविवारी शिवसैनिक जनसेवेसाठी मैदानात!

मुंबई : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांसह मुंबईतील सामांन्य नागरिकांच्या नागरिहक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना पुरस्कृत सिद्धेश कदम फाउंडेशन अयोजित ‘ शिवसेना जनतेच्या दारी’ या अभिनव, नाविन्यपूर्ण उपक्रमास संपूर्ण मुंबईतून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘ शिवसेना जनतेच्या दारी’ या अभियानातून २५ हजार नागरिकांनी थेट लाभ घेतला असून मुंबईत जनसेवेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.


प्रशासकीय कामात सामान्य नागरिकांना कायम ‘ सरकारी काम,अन् सहा महिने थांब’ या म्हणी प्रमाणे प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागतात, शहरी असो वा ग्रामीण नित्य कर्मात व्यस्त असेलेला नागरिक ‘नको रे बाबा’ म्हणत प्रशासकीय कामाला बगल देत असतो. प्रशासनाच्या महसूल, पंचायत, महापालिका प्रशासनातील कामांसाठी कार्यालयाचे उंबरे झिजवणं सामान्य नागरिकांच्या पाचिला पुजलेलं. अगदीच नागरिहक्कांच्या शुल्लक कामांसाठीही जबाबदार प्रशासकीय कार्यालयात येर झर्‍या मारताना वाया जणारा वेळ, खर्च होणारा पैसा, होणारी हेळसांड यातून अथक प्रयत्न करूनही पदरी पडलेल्या निराशेमुळे सामान्य नागरिक गरज असतानाही प्रशासकीय कामांसाठी धजावत नाहीत, मात्र बारामही समस्यांशी झुंजणार्‍या संपूर्ण मुंबईतील नागरिकांना त्यांच्या उंबर्‍यात थेट नागरिहक्क बहाल करणार्‍या विविध योजनांचा लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम शिवसेना पुरस्कृत सिद्धेश कदम फाउंडेशनच्या वतिने राबविण्यात आला आहे.


शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन अयोजित ‘ शिवसेना जनतेच्या दारी’ हे विशेष अभियान जून महिन्याच्या प्रत्येक रविवारी राबवण्यात आले. संपूर्ण मुुंबईतील एकामागून एक अशा मतदारसंघामध्ये या मोहिमेचा धडाका राबवण्यात आल्याचे मुंबईकरांनी प्रत्यक्ष अनुभवले. विशेष म्हणजे या नाविन्यपूर्ण लोकाभिमुख अभियानामध्ये एकून २५,००० हून अधिक नागरिकांनी नोंदणीचा लाभ थेट लाभ घेतला आहे.

या विशेष महाअभियानाची सुरूवात ७ जून रोजी दिंडोशी आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. त्यानंतर १४ जून रोजी अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व, २१ जून रोजी वर्सोवा व अंधेरी पश्चिम आणि २८ जून रोजी मालाड पश्चिम व कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या उत्सपूर्त प्रतिसादाने मोठ्या उत्साहत पार पडले. महाशिबीर मोहिमेस मुंबईकरांचा अभूतपूर्व उदंड प्रतिसाद मिळाला. महाशिबीरामध्ये नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जन अरोग्य योजना, स्मार्ट रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, रहिवासी दाखला, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती, आणि वास्तव्याचा दाखला या सर्व सेवांचा मोफत लाभ उपलब्ध करून देण्यात आला. सर्व कागदपत्रांची पडताळणी आणि नोंदणी प्रक्रिया एकाच छताखाली पूर्ण झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठी सोय झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (म.प्र.नि.) मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव व संपर्क नेते श्री. सिद्धेश कदम यांनी प्रत्येक रविवारी या शिबीरांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी करून नागरिकांशी थेट संवादातून समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमाबाबत बोलताना सिद्धेश कदम म्हणाले , “ हा उपक्रम केवळ उत्तर- पश्चिम लोकसभा किंवा उत्तर मुंबईपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण मुंबईत राबवला जाणार आहे. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणिय श्री. एकनाथ शिंदे साहेबांची जनसेवेची शिकवण आणि त्यांची गतिमान कार्यपद्धती आम्हाला नेहमी प्रेरणा देते. समाजातील शेवटच्या तळागळातील नागरिकांपर्यत शासनाच्या सर्व सेवा आणि योजना पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

रविवार हा साधारणपणे सुट्टीचा आणि आरामाचा दिवस असतो, परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या शिवसैनिकांनी एकही सुट्टी न घेता, प्रत्येक रविवारी स्वत:ला या कार्यात पूर्णपणे झोकून दिले. शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रत्येक शिबरीराचे चोख नियोजन केले. सर्व स्वयंसेवकांनी नागरिकांना अर्ज भरण्यापासून ते कागदपत्रे जोडण्यापर्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. “ इथून पुढे सुद्धा प्रत्येक शिवसैनिक मुंबईकरांच्या जनसेवेसाठी असाच कटिबद्ध राहील, ” असा ठाम विश्वास उपस्थित पदाकिधार्‍यांनी व्यक्त केला.

Comments


bottom of page