top of page

शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदासाठी कोणताच प्रस्ताव आलेला नाही- मंत्री बावनकुळे


मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर महापौरपदावरुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही महासपौरपद कोणाकडे जाणार या बाबत अद्याप स्पष्टता नव्हती . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडीच वर्षेे महापौरपद मिळणार, अशा चर्चांनी राजधानीत वातवरण तापले होते. मात्र आता या विषयावर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “ बहुमत हे चंचल असतं, आज असतं उद्या नसतं” असे विधान करत मुंबईतील सत्तासमिकरण बदलण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडीही महापौरपदासाठी हालचाली करत असल्याची चर्चा होती. अशा पार्श्वभूमीवर शिंदे गट भाजपकडे अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेण्याचा प्रस्ताव देत असल्याचे बोलले जात होते.


यरा चर्चावर भाजपाचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भुमीका मांडली आहे. “ शिंदे यांच्या शिवसेनकडून भाजपकडे महापौरपदाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. या सगळ्या चर्चा केवळ अफवा आहेत. ” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अडीच-अडीच वर्षाच्या महापौरपदाच्या चर्चेला सध्या पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिंदे गटाचे सर्व निवडून आलेले नगरसेवक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले असल्याने‘ हॉटेल पॉलिटिक्स’ ची चर्चा रंगली होती. यावरही बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत ‘हे केवळ गेट टुगेदर असून त्यात काहीही गैर नाही’ असे स्पष्ट केले आह


दरम्यान संजय राऊत यांनी शिंदे गट व भाजपवर नगरसेवकांना ‘ डांबून ठेवण्याचा’ आरोप केला होता. यावर बावनकुळे यांनी आक्रमक प्रत्युत्तर देत, “ राऊत यांनी आधी स्वत:चूे आमदार सांभाळावेत जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते नगरसेवक काय सांभाळणार”? असा टोला लगलावला. तसेकच, आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही. आम्ही आमचे कार्यकर्ते व्यवस्थित सांभाळतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौर्‍यावर असतानाही मुंबईतील सत्तासमीकरणावर लक्ष ठेवले जात आहे. महायुतीतील जागावाटप आणि नेतृत्वावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असणार की शिंदे गटाचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page