शिवसेना (शिंदे)पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियक्त्या
- Navnath Yewale
- 19 hours ago
- 2 min read

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुमाकुळ सुरू आहे. युती, आघाडीसह पक्षप्रेवशावरून महायुतीत धूसपूस सुरू आहे. यावरून नाराज एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत भाजपच्या राज्य नेतृत्वाची तक्रार केल्याचे वृत्त असतानाच आता एकनाथ शिंदे ऍक्शनमोडवर आले आहेत. आज शिवसेना (शिंदे) जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्याने हे सिद्ध झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये कुठे युती तर कुठे मैत्रिपूर्ण लढती होत आहेत. मात्र, दुसरीकडे वर्चस्वासाठी स्थानिक पातळीवर पक्षप्रवेशाची चढोओढ सुरू आहे. त्यातच कल्याण- डोंबिवली च्या पक्षप्रवेशावरून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली दरबारी भाजप च्या राज्य नेतृत्वाची तक्रार केल्याचे बोलले जात आहे.
पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनच्या मंत्र्यांची कानउघाडणी करत ‘याची सुरूवात तुम्ही उल्हासनगर मधून केली’ असे सुनावल्याचे सूत्रांची माहिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौर्यानंतर ऍक्शन मोडवर आले आहेत. नाराज एकनाथ शिंदे यांनी आज राज्यात जिल्हासंपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
यामध्ये सिंधुदूर्ग-किरण पावसकर, राजेश मोरे, रत्नागिरी- यशवंत जाधव, रायगड ग्रामीण- संजय घाडी, नवी मुंबई शहर- नरेश म्हस्के, पालघर- रवींद्र फाटक, ठाणे ग्रामीण - प्रकाश पाटील, ठोण शहर- नरेश म्हस्के, पुणे- नरेश म्हस्के, पिंपरी चिंचवड शहर - सिद्धेश कदम, पुणे ग्रामीण- श्रीरंग आप्पा बारणे, रामभाऊ रेपाळे, सातारा- शरद कणसे, सांगली- राजेश क्षीरसागर, कोल्हापूर- धैर्यशील माने, संजय मंडलिक, सोलापूर- संजय कदम, नाशिक लोकसभा- रामभाऊ रेपाळे, दिंडोरी लोकसभा- भाऊसाहेब चौधरी, जळगाव- सुनिल चौधरी, नंदुरबार- राजेंद्र गावित, धुळे- मंजुळा गावित, छत्रपती संभाजीनगर महानगर- विलास पारकर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण- अर्जुन खोतकर, जालना- अर्जुन खोतकर, भास्कर आंबेकर, बीड- टी.पी. मुंडे, मनोज शिंदे, धाराशिव- राजन साळवी, नांदेड- सिद्धराम म्हेत्रे, लातूर- किशोर दराडे, बुलढाणा- हेमंत पाटील, परभणी- आनंद जाधव, नागपूर ग्रामीण- दिपक सावंत, नागपूर शहर - दिपक सावंत, गडचिरोली - दिपक सावंत, किरण पांडव, भंडारा - गोपीकिशन बाजोरिया, अमरावती- नरेंद्र भोंडेकर, यवतमाळ- हेमंत गोडसे, वाशिम- जगदीश गुप्ता, हिंगोली- हेमंत पाटील, अकोला- अभिजित अडसूळ, चंद्रपूर- किरण पांडव, अहिल्यानगर- विजय चौघुले यांचा समावेश आहे.



Comments