top of page

शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला...

बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान; सत्ताधार्‍यांकडून टीका

ree

महायुती सरकारने शेतकर्‍यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली. शेतकर्‍यांनीच शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडलं, असे कडू यांनी म्हले.


छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदसरीची पद्धत बंद करण्यात आली. या वतनदारीतून गुलामशाही, निजामशाही आणि आदिलशाही चालायची. ही वतनदारी बंद केल्यानेच संंभाजी महाराज हे त्यांच्या सासर्‍यांकडून मारले गले. नाव औरंगजेबाचे असला तरी सासरा किती कारणीभूत आहे. शोधल का? का कारणीभूत आहे. राजा असा पाहिजे. तो मरण पत्कारायला तयार झाला. पण त्याने सासर्‍याला वतन दिले नाही, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी रविावारी बुलढाण्यातील पातुर्डा गावातील शेतकरी हक्क परिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना मिळणार्‍या अपुर्‍या मदतीवरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले.


महायुती सरकारने शेतकर्‍यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली, शरद जोशी, डॉ. बाबासाहे आंबेडकांना पाडलं, मलाही पाडल. शेतकरी हे जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही, नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल. गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहरं श्रीमंत होतील. सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही शहरातले आमदार परवडले, पण शेतकर्‍यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं. तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ मारता येते. शेतकर्‍याला आपण जर विचारलं तर तु काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदारला कापून टाका, असंही बच्चू कडू म्हणाले.


शेतकर्‍यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकर्‍यांनी बांगड्या भाराव्यात. मोर्चे, मेहावे, प्रचाराला गर्दी असते, मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का? अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकर्‍यांसाठी लढले. शरद जोशींना शेतकर्‍यांनी पाडलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं. मलाही शेतकर्‍यांनीच पाडलं. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.


मंत्री शिरसाट यांची टीका

शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे, या बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. आमदाराला कापण्याचं काम बच्चू कडू यांनीच करावे. त्यांना शेतकर्‍यांवर आणखी गुन्हे दाखल करायचे आहेत का? त्याऐवजी त्यांनी स्वत:च हे काम करावे. एखादे वक्तव्य करताना बच्चू कडू यांनी भान ठेवले पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Comments


bottom of page