संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता.. जरांगे पाटीलाचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी
- Navnath Yewale
- Nov 10, 2025
- 1 min read

बीड: मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुट——े यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने संताष देशमुख यांच्यावर काळकुटे यांचाच नंबर असल्याची धमकी दिली आहे. या संदर्भात जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी दादा गरड यांचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून एका अज्ञात व्यक्तीने काळकुटे यांना संतोष देशमुख यांच्यानंतर तुमचाच नंबर आहे, अशी धमकी देण्यात आली. जर हिंमत असेल तर परळी येथील जगमित्र कार्यालयात येण्यासह त्यांना आव्हान देण्यात आले. दरम्यान, गंगाधर काळकुटे यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, गंगाधर काळकुटे यांच्या जीवीत्वास धोका असून त्यांना संरक्षण देण्याची मागणी मराठा सेवकांकडून करण्यात येत आहे .
परळी तालुक्यातील मराठा सेवक दत्तात्रय गव्हाणे यांना शुभम चाटे याने फोन वरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मराठा बांधव सिरसाळ पोलिस ठाण्यात दाखल झाले. दरम्यान, लुगडे महाराजांनी सोशल मिडियावर लाईव्हवर एकेरी कमेंटला प्रतीउत्तर दिल्यामुळे शुभम चाटे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दत्तात्रय गव्हाणे यांनी केला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज सिरसाळा पोलिस ठाण्यात मराठा सेवकांनी निवेदन दिले.



Comments