संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींकडून साक्षीदार फोडण्याचा डाव आखले जात आहेत - अॅड उज्वल निकम
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 3 min read
बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आडिच तास युक्तीवाद

बीड: मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. वर्ष उलटूनही आरोंपीवंर अद्याप चार्ज फेम नाही. सरकारी पक्षोच वकील उज्वल निकम यांनी या बाबत नाराजी व्यक्त केली होती. आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आडीच तास सुनावणी पार पडली यामध्ये सरकारी पक्षाकडून चार्ज फेम करण्याचा युक्तीवाद करण्यात आला.
सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात संपन्न झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांनी व्हिसीद्वारे युक्तीवद केला. आरोपी न्यायालय आणि जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत, शिवाय आरोपींकडून साक्षीदार फोडण्याचा डाव आखल्या जात असल्याने आज चार्ज फेम करण्याची मागणी मा. न्यायालयाकडे करण्यात आली. आरोपींच्या वकीलांकडून डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचे कारण देत आरोपींवर चार्ज फेम करण्यात येवू नये, आमचे उच्च न्यायालयात अर्ज प्रलंबीत आहेत. त्यामुळे चार्ज फेम करू नये असा युक्तीवाद करण्यात आला.
त्यावर कार्टाने उच्च न्यायालयाची ऑर्डर आहे का? असा प्रश्न आरोपींच्या वकीलांना विचारला. त्यावर आरोपींच्या वकीलांनी आम्हाला डिजिटल पुरावे मिळाले नाहीत. सरकारी पक्षाकडून डिजिटल पुराव्याचे लॅपटॉप मा. न्यायालयात सादर केले नाहीत, ते फॉरन्सिकलॅब कडे पाठविले आहेत. आम्हाला आवादा कंपनीचे सुनिल शिंदे यांच्या ऑडिओ क्लिपचा पेनड्राईव व लॅपटॉपमधील डिजिटल पुरावे मिळाले नाहीत म्हणून चार्ज फेम करण्यापूर्वी आम्हाला संधी देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.
सरकारी पक्षाकडून वकील उज्वल निकम यांनी आरोपींकडून तेच तेच मुद्दे उपस्थित करून मा. न्यायालय व जनतेची दिशाभूल केली जात असून चार्ज फेम करण्याचा जोरदार युक्तीवाद करण्यात आला. यावर आरोपींच्या वकिलकांकडून तब्बल सोळा वेळा आठ दिवसांचा वेळ वाढवून द्यावा अशी कोर्टाकडे मागणी करण्यात आली. शेवटी किमान एक दिवसाचा वेळ मिळावा असाही आरोपींच्या वकीलांकडून युक्तवाद करण्यात आला.
कराडच्या जामीन अर्जावरील उच्च न्यायालयातील सुणावनीत काय घडलं: (छत्रपती संभाजीनगर)
मस्साजोगचे माजी सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा जोरदार युक्तीवाद सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा केला. तर या हत्याकांडात विनाकारण गोवल्याचा दावा करत कराडच्यावतीने खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. न्या.एस.एम. घोडेस्वार यांच्यासमोर हा युक्तीवाद झाला. या प्रकरणाची उर्वरित सुनावणी मंगळवारी (16)
होणार आहे.
मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेत आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 अंतर्गत आर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे कलम लागू असताना आरोपीला सहजासहजी जामीन मिळत नाही. पण तरीही वाल्मिकच्या जामिनसाठी त्यानं खंडपीठात धाव घेतली आहे. वाल्मिकच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, वाल्मिक कराडला अटक करताना लेखी माहिती किंवा नोटीस दिली नाही. याचा संदर्भ देताना सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा विरुद्ध राज्य सरकार यांसह विविध निवड्यांचा यावेळी हवाला देण्यात आला.
वाल्मिक कराडला लावलेला मकोका चुकीच्या पद्धतीने लावला. वाल्मिक कराड याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सरपंच देशमुख यांची हत्या झाली तेंव्हा कराड शेकडो किलोमिटर दूर होता. या प्रकरणात कराडला खोट्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा मुद्दाही यावेही त्याच्या वकीलानीं मांडला. या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.12) सकाळी साडेअकरा वाजाता सुनावणी सुरू झाली. यावेळी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी सायंकाळपर्यंत सल सहा ते सात तास युक्तीवाद केला. गिरासे यांनी वाल्मिक कराडचे खून प्रकरणाशी थेट कसा संबंध आहे? याचे अनेक पुरावे आणि प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम तपशीलवार उलगडून दाखवला. या घटनेतील साक्षीदार, सीडीआर अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्डींग, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात दाखवण्यात आला.
या सगळ्या पुराव्यांवरुन वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तीवाद गिरासे यांनी केला. कराडने अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकार्यांनी नकार दिल्यामुळे कराडने सुदर्शन घुले याला कंपनीला बंद करण्यासाठी पाठवले होते. घुलेने कंपनीच्या पहारेकर्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. अधिकार्यांना खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमक्या देत कंपनी बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीड जिह्ह्यातील अतिशय मागास भागातील कंपनी बंद होऊ नये आणि येथील तरुणांचा रोजगार जाऊ नये, अशी विनंती सरपंच संतोष देशमुख यांनी केली होती. तसेच पोलिसात तक्रार दिली होती. त्यावर सुदर्शन घुलेने देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात कराड याने आपल्या मागणीच्या आड येणार्या देशमुखला आडवा करा, असा आदेश दिला. त्यानुसार सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकार्यांनी उमरी टोलनाक्यावरून संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यांना निर्जन स्थळी नेऊन मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करत मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. कराड हाच मारेकर्यांना निर्देश देत होता. अशी बाजू गिरासे यांनी मांडली.



Comments