सभापती राम शिंदेंनी उपसभापती नीलम गोर्हेंचे आदेश रद्द केलेसातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आज मुख्यालयात हजर
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

मुंबई: पोलीस अधिक्षक तुषार दोशी हे आज त्यांचा पोलीस मुख्यालयात हजर झाले असून दैनंदिन कामकाजाला देखील त्यांनी सुरुवात केली आहे. विधिमंडळ अधिवेशन कार्यकाळात उपसभापती नीलम गोर्हे यांनी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभापती राम शिंदे यांनी उपसभापतींचा आदेश रद्द करत सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोशी यांचे निलंबन झाले की नाही, हा प्रश्न अनुत्तरीत होता. मात्र, तुषार दोशी आज आपल्या कार्यालयात हजर झाल्याने त्यांचे निलंबन झाले नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषद सभागृहात घेऊन जाताना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. या दरम्यान झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि त्यांच्या काही अधिकार्यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती. या मागणीनंतर सभागृहात उपसभापती नीलम गोर्हे यांनी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे सांगितले. तसेच, सभापती, उपसभापती आणि तालिका अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातही त्यांनी कायदेशीर बाजू तपासण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यातच, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभापती राम शिंदे यांनी नीलम गोर्हे यांनी दिलेले आदेश रद्द केले.
या घटनाक्रमानंतर पोलिस अधिक्षक दोशी हे आज दोन दिवसांनंतर पोलिस मुख्यालयात हजर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली किंवा त्यांचे निलंबन झालेच नाही, हे स्पष्ट झालेलं आहे.
दरम्यान, सभापती राम शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर सातार्याचे एसपी तुषार दोशींचे निलंबन झाले की नाही? असा सवाल मंत्री शंभुराज देसाईंनी सभागृहात केला होता. तसेच, निलंबन केलं की नाही ते सांगावे नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ, असे शशिकांत शिंदेंनी म्हणाले. त्यावर आता बोलणे उचित नाही, असे उत्तर सभापती राम शिंदे यांनी दिले. त्यानंतर सातारा प्रकरणावरुन विधानपरिषदेचे कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आले. शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई, शशिकांत शिंदे यांनी आक्षेप घतला. या आक्षेपानंतर विधानपरिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.



Comments