top of page

सांगोल्यात शिवसेना (शिंदे) गटातील माजी आमदाराच्या कार्यालयावर पथकाची धाड

माजी आमदार शहाजी बापू पाटील भाऊक; भाजपवर निशाना

ree

सोलापूर : शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर स्थनिक गुन्हे अन्वेशन आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने धाड टाकली. कार्यवाहीत रेकॉर्डिंग करण्यात आल्याची माहिती आहे. माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. हेच नाही तर काल रात्री सांगोल्यातील आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी निवडणूक अधिकार्‍यांकडून करण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दिपक आबा साळुंखे यांच्या सागण्यावरून ही कारवाई झाली असल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला आपला पराजय दिस असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी ही कारवाई केल्याचं शहाजी बापू म्हणाले.


सांगोला नगरपालिका निवडणुकीवरुन शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार शहाजी बापूू पाटील मागील काही दिवसांपासून भाजपवर निशाना साधत आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारण पदाधिकार्‍यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे शाहजी बापू पाटील यांनी थेट गुवाहटी प्रकरणाची आठवण काढली होती. दरम्यान, शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर काल अचानक स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग आणि निवडणुक अयोगाच्या भरारी पथकाने धाड टाकली. या कारवाईनंतर शहाजी बापू यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही सगळी माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले.


शहाजी बापू यांच्या कार्यालयावर धाड पडल्याच्या प्रकणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले की, सत्तेत आहे की, बाहेर यावर धाड ठरत नसते. माझीही गाडी तपासली जाते. त्यामुळे यामध्ये काही सत्ताधारी आणि विरेाधक अशा गोष्टी नसतात. तक्रारी आल्यानंतर आमच्याही कार्यकर्त्यांच्या तपासणी झाल्या असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


कार्यालयावरील धाडीच्या कार्यवाही नंतर शहाजी बापू पाटील थेट भाजपवर निशाणा साधला. यापूर्वी आपण निवडणुकीवेळी भाजपाला कायमच मदत केल्याचेही ते म्हणाले.

शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर धाडीच्या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page