सीजेआय गवईंचं मन मोठं, बार काऊन्सिलनं ‘त्या’ माथेफिरु वकिलास मोठा दणका
- Navnath Yewale
- Oct 6
- 2 min read

देशाचे मुख्य न्यायाधीश अर्थात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट फेकण्याचा प्रयत्न करणारा आणि हे कृत्य करताना सनातनचा नारा देणारा माथेफिरु वकीलावर बार काउन्सिल ऑफ इंडियानं मोठी कारवाई केली आहे. या वकिलावर कार्टात प्रॅक्टिस करण्यासापासून तात्काळ प्रभावानं बडतर्फीची ऑफ इंडियानं मोठी कारवाई केली आहे. या वकिलावर कोर्टात प्रॅक्टिस करण्यापासून तात्काळ प्रभावानं बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सरन्यायाधिशांबाबत केलेल्या या अत्यंत निंदनीय प्रकाराचा आता सर्वच स्तरातून निषेध व्हायला लागला आहे.
सरन्यायाधिशांवर बुट फेकून हल्ल्याचा प्रयत्न करणार्या वकिलाचं नाव राकेश किशोर असं असून तो 71 वर्षाचा आहे. बार काऊन्सिलचा तो 2011 पासून अस्थायी सदस्य आहे. दिल्लीच्या मयूर विहार भागातील तो रहिवासी आहे. कोर्ट क्रमांक 1 मध्ये सुनावणीदरम्यान माथेफिरू राकेश किशोर या वकिलानं सकाळी 11.35 वाजता आपल्या पायातील स्पोर्ट्स शूज काढला आणि तो सरन्यायाधिशांच्या दिशेनं भिरकावला. त्याच्या या कृतीनंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ पकडलं आणि सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षा दलाच्या ताब्यात दिलं. त्यानंतर दिल्ल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या माथेफिरु वकिलाची चौकशी केली. यावेळी त्याच्याकडं एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये त्यानं लिहिलं की माझा हा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे. सनातन धर्माचा आपमान हिंदुस्तान कधीही सहन करणार नाही. पोलिसांना त्याच्याकडं सुप्रीम कोर्ट बार आसोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार काऊन्सिल या संघटनांचा सदस्य असल्याचं कार्डही आढळून आलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी दिल्ली पोलिसांकडून राजेश किशोर याची कस्टडी मागितली. सुत्रांच्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलची मंजुरी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा दल आणि नवी दिल्लीच्या जिल्हा पोलिस अधिकार्यांनी त्याची चौकशी केली. चौकशीनंतर तीन तासानंतर त्याला सोडून देण्यात आलं. कारण रजिस्ट्रानं या वकिलाविरोधात आरोप लावण्यास नकार दिला.
बार काऊन्सिलचा कारवाईचा इशारा
दरम्यान, बार काऊन्सिलनं या कृत्याची गंभीर दखल घेत माथेफिरू राजेश किशोर याला तात्काळ प्रभावानं कोर्टात प्रॅक्टिस करण्यापासून बडतर्फ करण्यात आलं. भाजपचे खासदार आणि बार काऊन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्याशी म्हटलं की, हा अत्यं दु:खद आणि लाजिरवाणा प्रकार घडला आहे. आपले सीजेआय देखील सनातनी आहेत, ते मंदिरात जातात, या घटनेनं देशतील सर्व वकिलांची लाज काढली आहे. याविरोधात आम्ही कारवाई करणार आहे.



Comments