सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार पक्षाच्या राष्ट्रीयअध्यपदीही निवड; शपथविधीची तयारी सुरू
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवारयांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होवून सायंकाळी 5:00 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांंनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. लोकभवनात शपविधीची तयारी सुरू झाली असून अत्यंत साध्या पद्धतीने शपविधी होणार आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात येणार आहे.
उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवास्थानी दाखल झाले होते. वर्षा निवास्थानी बैठक झाली, आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी पोहोचले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. उद्या 2:00 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीमध्ये गट नेत्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे उपस्थित करायचे? गट नेता कशा पद्धतीने निवडायचा यासर्व गोष्टींवर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यापूर्वी दुपारी 2:00 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्वाची बैठक पार पाडणार आहे, या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. या पर्श्वभूमीवर पक्षाकडून विधीमंडळास पत्र पाठवण्यात आलं आहे. उद्या आमदारांच्या बैठकीस जागा द्यावी, अशी मागणी या पत्रद्वारे करण्यात आली आहे, उद्या विधानभवनात ही बैठक होणार आहे. अद्याप पक्षाकडून निरोप नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे सावधगिरी बाळगत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, अनेक आमदार हे आज रात्रीच तर काही आमदार उद्या सकाळपर्यंत मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे.



Comments