सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्रच्या ‘पहिल्या’ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
- Navnath Yewale
- 3 days ago
- 3 min read

मुंबई: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. या शपविधी सोहळ्याला मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे उपसभापती निलम गोर्हे यांच्यसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेता पवार यांनी आज शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार शपथ घेत असताना कार्यकर्त्यांनी अजित पवार अमर रहे अमर रहे, एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्य. सुनेत्रा पवार यांच्या शपविधी साहेळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेता पवार यांची निवड केेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश आमदार या शपविधी सोहळ्याला उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला महायुतीमधील पक्षांचे इतर नेते देखील उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यांनतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आयार्च देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्ठाचार अधिकारी उपस्थित होते.
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड: सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाची महत्वपूर्ण बैठक विधिमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यत आली.

शरद पवार म्हणाले
एकीकडे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, अशा स्वरुपाच्या सगळ्याव हालचाली मुंबईत सुरू असताना दुसरीकडे बारामतीमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबद्दलची कोणतीही चर्चा आमच्याशी झालेली नाही. तसा प्रस्तावही नाही आणि विचारणाही झालेली नाही. कदाचित तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असू शकतो. पण मला या बद्दल काहीही माहिती नाही.” दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर ते म्हणाले की, “ अशा स्वरुपाची सकारात्मक चर्चा गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील याबद्दल चर्चा करत होते. गेल्या 12 तारखेला हा निर्णय जाहीर करण्यात येणार होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही दादांची इच्छा होती. ती पूर्ण व्हावी. हीच आमची इच्छा आहे.” असंही ते म्हणाले.
मात्र आता जे उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरूये, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. प्रस्ताव नाही, विचारणा, चर्चा नाही असंही पवार म्हणाले. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की विलिनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसतोय, आची चर्चा झाली होती, त्यात भाजपसोबत जायचा संबंध नव्हता असंही पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “ सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत आमच्याशी कसलीही चर्चा करण्यात आलेली नाही. सुनेता पवारांना नेता निवडण्यात घाई का करण्यात येतेय, याबाबत मला माहित नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबततच्या चर्चा नक्कीच
झाल्या होत्या. म्हणून तर आम्ह आता घड्यावर लढतोय. 12 फेंब्रूवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार होती” असंही ते म्हणाले.
सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी : एकीकडे सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड होवून त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
याच्या काही वेळेआधी सुप्रीया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवास्थानी दाखल झाल्या. अजित पवार यांच्या आई अशा पवार यांची भेट घेण्याकरिता सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी आल्या होत्या. अशा पवारांना भेटल्यांनतर संप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्याम्हणाल्या की, शपथविधीबद्दल आपल्याला कल्पना नाही, “ मी दिल्लीला जाणार आहे. अधिवेशनात मी फ्लोअर लीडर आहे. पार्थ त्यांच्या आजी आजोबांना भेटायला आला होता. बाकी काही नाही .” शपविधीबद्दल आपल्याला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.



Comments