सोनम वांगचुक यांना दिलासा नाहीच! हायकोर्टानं याचिका फेटाळली

नवी दिल्ली : गेल्या तिन आठवड्यापासून बेमुदत उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांंना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. न्यायालयानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. वांगचुक यांची ढासळती प्रकृती पाहता त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय योग्य होता, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
उपचारांबद्दलचे सगळे वैद्यकीय निर्णय डॉक्टरांचं पथक सोनम वांगचुक यांच्या सहमतीनरं घेतील, असं दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर उपचार सुरू राहतील आणि एम्सचे डॉक्टरदेखील त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतील, असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि रुग्णालय यांच्याकडून उच्च न्यायालयानं तिन दिवसांत अहवाल मागवला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 जुलैली होणार आहे.
शरीराची वैद्यकीय स्थिती वेळी सारखी नसते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाला संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवावं लागतं. वांगचुक यांच्या प्रकृती बिघडल्यानं सरकारनं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय गरज पाहता हा निर्णय योग्य होता, असं न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं. सोनम वांगचुक कोणत्याही प्रकारच्या अटकेत नाहीत. त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात त्यांना जाऊन भेटण्याची परवानगी आहे. उपचारांच्या दरम्यान पुढे घेतले जाणारे वैद्यकीय निर्णय डॉक्अरांच्या सहमतीनं घेतले जातील, ही बाब न्यायालयानं स्पष्ट केली.
सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या वतिने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सिब्बल यांनी केली. वांगचुक यांना त्यांच्या डॉक्टरांना आणि वकिलांना पूर्णपणे भेटायला मिळत नाही. रुग्णाला त्याच्या गरजेनुसार, इच्छेनुसार त्याच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचारप घेण्याचा अधिकार आहे. खासगी रुग्णालय रुग्णवाहिका पाठवण्यास तयार आहे. त्यांची मागणी केवळ उपचारांसाठी तिथे शिप्ट होण्याची आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.



Comments