सोनम वांगचुकांच्या विरोधात पोलिसांचा वापर, ...तरी देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही.

नवी दिल्ली: पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील जंतरमंतरवरून पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वांगचुक यांच्या विरोधात केलेल्या बळाच्या वापरानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले की, “ सोनम वांगचुक जी हे अहिंसक उपोषणावर असताना त्यांना जंतर मंतरवरून हटवणे ही चुकीची कृती आहे”
वांगचुक यांच्या अटकेचा निशेध करून राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांच्या समस्येवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर प्रश्न आहेत, या मुद्यांवरून सरकारची जबाबदारी मोठी आहे.”
सरकारने कितीही बळाचा वापर केला, तरी देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही. असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “ कोणतीही शक्ती भारताच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या आम्हाला हे प्रश्न मांडण्यापासून रोखू शकत नाही आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्कासांठी लढत राहू, असा इशारा देखील त्यांनी दिला.
सोनम वांगचुक यांनी पत्नी, गीतांजली आंगमो यांच्या मार्फत रुग्णालयातून आंदोलकांसाठी खास संदे पाठवला आहे. यामध्ये त्यांनी 20 जुलै रोजीचा संसदेवरील मोर्चा चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी कले आहे. हा मोर्चा म्हणजे भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.



Comments