सोशल मिडियावरून आयोध्येचे राम मंदिर उडणविण्याची धमकी!
- Navnath Yewale
- Aug 2
- 1 min read
ऑडिओ मॅसेज; बीडच्या तरुणाला कटात सहभागी होण्याची ऑफर, शिरुर पोलिसात गुन्हा

आयोध्येतील राम मंदिर आरडीएक्सने उडवायचं आहे, त्यासाठी आम्हाला 50 तरुणांची अवश्यकता आहे.‘ तु 50 मुलं आम्हाला दे, या कटात सहभागी हो तुला एक लाख रुपये बक्षिस देतो. असा इन्स्टा यूजर्सने ऑडिओ मॅसेज करत बीडच्या तरुणाला आयोध्येचे राम मंदीर उडवण्याची धमकी देत सोसशल मिडियाच्या इन्टाग्रामवरून ऑफर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तरुणाने तत्काळ शिरुर कासार पोलिस ठाणे गाळून सबंधीत युजरर्स च्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर कासार (जि.बीड) शहरातील ऑफर मिळालेल्या तरूणाने काही दिवसापूर्वी सोशल मिडियाच्या इन्स्टाग्रामवर रिल सेंट केली. त्या रिलवरून कमेंटच्या माध्यमातून समोरील इन्स्टा युजर्सने बीडच्या तरुणाशी चॅटिंग वाढली. काही दिवसात समोरील युजरर्सने बीडच्या तरूणाच्या इन्स्टाच्या वैयक्तिक आयडीवर कमेंट- चॅटींग करायला सुरूवात केली. दरम्यान, (31 जूलै) पूर्वी बीडच्या तरुणास ऑडिओ मॅसेज पाठवला ज्यामध्ये ‘ आयोध्येचं राम मंदीर आरडीएक्स ने उडवायचं आहे, त्यासाठी मला 50 तरुणांची अवश्यकता आहे. तु आम्हाला तरुण उपलब्ध करून दे, त्यासाठी प्रत्येक तरुणाला एक लाख रुपये देऊ. अशी धमकी व ऑफर दिली.
समोरील इन्स्टा यूजर्स हा पाकिस्तानातील कराचीचा असल्याचे सांगत त्याने कराची येथील त्याचे लोकेशनही पाठवले आहे. पाकिस्तानातील कराची मधून आलेल्या धमकी, ऑफरमुळे सबंधीत तरुणाने तत्काळ शिरुर पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. तरुणाच्या फिर्यादीवरून बीड पोलिसांच्या सायबर यंत्रणेकडून घटनेचा कसून तपास सुरू आहे. बीडच्या तरुणाच्या मोबाईल डाटा खंगाळण्यासह इतर काही धागे-दोर हाती लागतात का? यासाठी तरूणाची चौकशी करण्यात येत आहे. बीडच्या तरुणाला सोशलमिडियावर पाकिस्तानाल्या कराचीतून आलेल्या धमकी,ऑफरच्या मॅसेजमुळे राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे.



Comments