स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सारीपाटावर हालचालींना वेग!
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read
धक्का, इनकमींग, पक्षप्रवेशाचे वारे; पक्षबल वाढविण्यासह टिकविण्याचे आव्हान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येवून ठेपल्याने राजकी पक्षात हालाचालींना वेग आला आहे. पक्षीय बलासाठी महायुतीमध्येच घटक पक्षांना गळतीची धास्ती आहे. जोरदार इनकमिंगमुळे भाजपनेही सवत्या सुभ्याची हाक देत मुंबईत एकत्र तर राज्यात स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीतही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे भाई जगताप यांच्या वक्तव्याने याला बळ मिळत असून जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी रननिती आखण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी महायुतीच्या भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष मुंबईत एकत्र तर राज्यात सोईनुसार काही ठिकाणी स्वबळावर, मैत्रीपूर्ण लढणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती मुंबईत एकत्र व राज्यात इतर ठिकाणी स्वबळावर लढून पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्टींनी निर्णय जारी केला असला, तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यानुसार युती, आघाडीचा चेंडू स्थानिक पातळीवर टोलवल्याचे दिसून येत आहे.
त्याच प्रमाणे महाविकास आघाडीतही काही अलबेल नसल्याचे चित्र आहे. मतदार याद्यांच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरणार्या महाविकास आघाडीमध्ये आता राज ठाकरे यांची भर पडली आहे. राज्यातील मतदार याद्या स्वच्छ झाल्या शिवाय निवडणूका घेवून दाखवाच! असा सज्जड इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. तर महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे बाळा नांदगांवकर यांचीही वर्णी लागल्याने आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. निवडणूक आयोगा विरोधात महाविकास आघाडीसह विरोधी सर्वपक्षीय 1 नाव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच आज काँग्रेसचे भाई जगताप यांच्या वक्तव्यावरून जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाई जगताप म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राज ठाकरेच काय पण शिवसेने सोबत जाण्याची कार्यकर्त्यांची माणसीकता नसल्याचे भाईजगताप म्हणाले.
भाई जगताप यांच्या वक्तव्याला मनसेकडूनही प्रत्यूत्तर देण्यात आलं आहे. “ कोणी हात पसरले त्यांच्याकडे, आमचे पक्षश्रेष्टी म्हणाले का?” असा उलट प्रश्न मनसेचे अविनाश अभ्यंकर म्हणाले. भाई जगताप यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचे यावरून दिसून येत आहे.



Comments