top of page

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय

राजकीय समिकरणं बदलणार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना

ree

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. सर्वच पक्ष शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणुक लढण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. एकूनच काय तर निवडणुकीची रणनिती आखली जात आहे. अशातच शरद पवार यांनी केलेल्या एका घोषणेमुळे महाराष्ट्राचे राजकारण बदलणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्री निवडणुक लढवण्याच्या निर्णयावर या आठवड्यात निर्णय घेतला जाईल. अशी माहिती शरद पवार यांनी दिलीय. महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचं शरद पवार म्हणाले. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देतील यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पदाधिकार्‍यांना शरद पवार यांनी दिल्या आहेत.

राज्यात जातीय सलोखा ठेवा, स्थानिक पातळीवर बोलताना जातीवाचक बोलू नका, अशा सूचना शरद पवारांनी पदाधिकार्‍यांना दिल्या. सरकारमधील काही नेते आणि मंत्री सध्या वादग्रस्त बोलत असल्याचा चिमटाही पवारांनी विरोधकांना काढला.


दरम्यान, सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणुक आयोगाला भेअणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहे. अत्यंत महत्वाच्या असलेल्या या निवडणुकांच्या यंत्रणेवर आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणुक पारदर्शक निष्पक्ष पद्धतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आहे. याभेटीनंतर उद्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आणि शरद पवारांची एकत्रीत पत्रकार परिषद होणार आहे. अशी माहिती संयज राऊतांनी दिली.


शरद पवारांची घोषणा

शरद पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित निवडणुक लढवण्याच्या निर्णयावर या आठवड्यात निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून हा निर्णय घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमि नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी दिली जाणार आहे. शरद पवार यांनी पदाधिकार्‍यांना जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात जातीय सलोखा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर जातीवाचक बोलू नका, अशा सूचना पवार यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत. तसेच सरकारमधील काही नेते आणि मंत्री वादग्रस्त बोलत असल्याचा चिमटा विरोधकांनी काढला आहे.

Comments


bottom of page