top of page

स्नेहभोजनाचे निमित्त : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत एकत्र! अजित पवार, प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला

ree


मुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्याच्या काही सहकार्‍यांसह महाविकास आघाडीचे नेते हे दिल्लीतील पवारांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. या गाठीभेटींमुळे राज्याच्या राजकारणा चर्चेंना उधान आले आहे. त्यामुळं हे सर्वजण केवळ स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेत की इतर काही राजकीय चर्चाही यावेळी होणार आहेत, याकडं सर्वांच लक्ष लागून आहे.


12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असतो. यानिमित्त आज दिल्लीतील पवारांच्या निवास्थानी राज्यातील खासदारांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त दोन्ही राष्ट्रवादीचे खासदार आणि नेतेमुडळी एकत्र आली आहेत. अजित पवारही मुंबईहून दिल्लीला रवाना झाले असून शरद पवारांच्या निवास्थानी पोहचले आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे खासदार आणि नेतेमंडळींना देखील या स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आल्यानं ते देखील पवारांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत.


अजित पवरांसोबत प्रफुल्ल पटेल हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्यात दिल्लीमध्ये स्नेहभोजनानिमित्त दोन्ही राष्ट्रवादीचे नेतेमुंडळी एकत्र आले आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून आणि मविआतून बाहेर पडून भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत घरोबा केला आहे. राज्यात सध्या ते सत्तेत आहेत, अधुनमधुन महायुतीतील नाराजीच्या बातम्याही येत असतात. यापार्श्वभूमीवर या भेटीगाठींना आणि चर्चांना विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

Comments


bottom of page