हिरोशिमातील अणुहल्ला; 80 वर्षानंतरही लोक नातेवाईकांचे अवशेष शोधत आहेत!
- Navnath Yewale
- Aug 4
- 1 min read

जपानवरील अणुहल्ल्याला 80 वर्ष उलटून गेली आहेत. वेदनादायक अणुहल्ल्याच्या आठ दशकांनंतरही, येथे राहणारे लोक त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. हिरोशिमाजवळील निनोशिमा बेटावर लोक त्यांच्या प्रियजनांचे अवशेष शोधत आहेत. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमावर जगात पहिल्यांदाच अणुबॉम्ब टाकला. या हल्ल्याच्या 80 वर्षानंतरही, लोकांच्या अशा जिवंत आहेत. येथे राहणरे लोक त्यांच्या नातेवाईकांचे अवशेष शोधत आहेत.

जपानच्या निनोशिमा बेटावर राहणारे हजारो लोक मारले गेले. आता पिडित कुटुंबे त्यांच्या प्रियजनांचे अवशेष शोधत आहेत. हिरोशिमापासून सुमारे 10 किलोमिटर अंतरावर असलेले निनोशिमा बेट 1945 च्या अणुहल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी तात्पुरते केंद्र बनले. अमेरिकेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मृत्युमूखी पडलेल्यांचे मृतदेहही निनोशिमामध्ये ठेवण्यात आले होते. जपानी नौदल हे मदत आणि बचाव कार्य हाताळत होते.
अणुहल्ला इतका प्राणघातक होता की, मृतांची ओळख पटवणे खूप कठीण होते. जपानी सैन्यात आत्मघाती मोहिमेसाठी प्रशिक्षित खलाशांनी बळींचे मृतदेह निनोशिमा येथे आणण्यास मदत केली. बळींची स्थिती त्रासदायक आणि अत्यंत भयानक होती. लोकांच्या मृतदेहांवरील कपडे जळाले होते, मृतदेह जाळल्यामुळे मांस लटकत होते.

80 वर्षापूर्वी, वैद्यकिय सुविधांचा अभाव होता. यामुळे 25 ऑगस्टपर्यंत म्हणजे हल्ल्यानंतर सुमारे 3 आठवड्यापर्यंत फक्त काही लोकांना वाचवता आले. मृतांना निनोशिमामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी घाईघाईने पुरण्यात आले.
हिरोशिमा अणुहल्ल्याच्या 80 वर्षानंतर 2025 मध्ये मनोरंजक महाहिती समोर आली आहे.
हिरोशिमा विद्यापीठाचे संशोधक रेबुन काओ गेल्या 7 वर्षापासून मृतांच्या अवशेषांसाठी खोदकाम करत आहेत. रेबुन काओ यांना 2018 पासून सुमारे 100 हाडांचे तुकडे सापडले आहेत, ज्यात एका बाळाचा जबडा देखील समाविष्ठ आहे. निनोशिमामध्ये बेपत्ता झालेल्या लोकांच्या अवशेषांचा शोध घेणारे काओ पिडितांच्या वेदना जाणवतात आणि त्यांच्या सन्मानार्थ फुले अर्पण करून प्रार्थना देखील करतात.
Comentários