top of page

हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा; बिहाराचा निकाल येऊन खूप दिवस झाले!

ree

नवीदिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी बिहारच्या निकालांचा उल्लेख केला. अनेक पक्ष त्यांच्या पराभवामुळे नाराज आहेत. पीएम मोदी यांनी विरोधकांना पराभवाच्या निराशेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. सोमवारपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात सरकार 14 विधेयके सादर करू शकते असे मानले जात आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले “ मित्रांनो या अधिवेशाना संसद देशासाठी काय विचार करत आहे, ती काय करू इच्छिते, ती काय करणार आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधकांनीही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. चर्चेत असे मुद्दे उपस्थित करा. पराभवाच्या निराशेतून बाहेर या. दुर्दैवाने, काही पक्ष असे असतात की ते पराभव पचवू शकत नाहीत, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी यावेळी लगावला.


“ मला वाटले होते की बिहारचे निकाला येऊन खूप दिवस झाले, आता ते सुधारले असतील, पण काल मी जे ऐकले त्यावरून असे दिसते की पराभवाने त्यांना त्रास झाला आहे. मी सर्व पक्षांना आवाहन करतो की हिवाही अधिवेशन हे पराभवाच्या भीतीचे ठिकाण बनू नये. आणि हे हिवाळी अधिवेशन विजयाच्या अहंकारात बदलू नये. असंही मोदी म्हणाले.


“अतिशय संतुलित पद्धतीने, जबाबदारीने, एक लोकप्रतिनिधि म्हणून देशातील जनेतेने मला ही जबाबदारी दिली आहे. ती हाताळताना,पुढे विचार करा, जे आहे ते आपण कसे चांगले करू शकतो. जर ते वाईट असले तर आपण योग्य टिप्पणी कशी करू शकतो, जेणेकरून देशातील नागरिकांचे ज्ञान वाढेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Comments


bottom of page