top of page

हैदराबाद गॅझेटिअरचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसवूनच घेतला- उपमुख्यमंत्री शिंदे

ree

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारने काल हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा शासन निर्णय पारीत केला. त्यांनतर ओबीसी नेत्यांकडून नाराजीचा सूर आवळण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसारीत होत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज छगन भुजबळ हैदराबाद गॅझेट बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.


माध्यमांशी संवाद साधना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काल सरकाने काढला आहे. त्याबद्दल सविस्तर मी मुख्यमंत्री बोललो आहे. जो निर्णय घेतलाय तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ करणं यावर तो निर्णय झाला आहे. जीआरमध्ये त्याचा उल्लेख आहे. अंमलबजावणीत कुठलीही अडचण येणार नाही. कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळतील. ओबीसी समाजाचं कुठलही नुकसान होऊ नये, ही सरकारची आधीपासून भूमिका होती अंसह उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


दरम्यान, छगन भुजबळांच्या नाराजीवर शिंदे म्हणाले की,“ आम्ही त्यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील, जो निर्णय घेतला आहे त्याची वस्तुस्थिती समाजवून सांगतिल. आम्ही घेतलेल्या निर्णयाची माहिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल” हैदराबाद गॅझेटनुसार 1967 आधीच कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे, त्या आधारावर प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर ओबीसी प्रमाणपत्र मिळेल. निश्चित कायद्याच्या चौकटीत बसवून,नियम लक्षात घेऊन रुल 2012 अंतर्गत काल जीआर काढला” असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल काल वक्तव्य केलं, आरोप केला हे दुर्भाग्यपूर्ण आहे. हे निंदाजनक आहे. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करत आहेत. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी काम करतायत. त्यांना आईचा आशिर्वाद आहे. कधीही त्यांच्या आईचा राजकारणाशी संबंध नव्हता. पंतप्रधानांच्या आईबद्दल बोलणंं, आरोप करणं खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. देशाच्या संस्कृती विरोधात आहे. देशाला संस्कृती, परंपरा आहे. आपण सगळे आईला पूजनीय मानतो. हा देशवासियांच्या आईचा अपमान आहे” असं शिंदे म्हणाले.


Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page