top of page

गुजरातमधील मथुरेत आयआयटीवाल्या भोंदू बाबाचे ‘खरात’ कांड इंजिनिअर मुली महिलांना प्रसाद म्हणून दुध पिण्यास द्यायचा; फोटोग्राफ, व्हिडिओ काढून मुलिंना करायचा ब्लॅकमेल

नाशिकमधील भोंदू अशोक खरात कांडाने महाराष्ट्रच नव्हेतर देश हादरवून सोडला. महीला लैंगिक अत्याचार प्रकरणात भोंदू अशोक खरात कारागृहात आहे. पोलिस, एसआयटीकडून खरात कांडाचा कसून तपासात सुरू आहे. देशभरात खळबळ उडवून देणार्‍या खरात कांड ताजा असतानाच आता गुजरामधील मथुरेतून खरात कांडाची पुनरावृत्त्ती समोर आली आहे. कथावाचक, प्रवचनकाराचा बुरखा पांघरलेल्या आयआयटी उच्चशिक्षित भोदू अभिषेक मिश्रा याचा महिला लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. छत्तीगडयेथील एका महिलेच्या तक्रारीवरून भोंदू अभिषेक मिश्रावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.


आध्यात्मिकतेचा बुरखा पांघरणार्‍या अभिषेक मिश्राचं शिक्षण आयआयटी सारख्या उच्च संस्थेतून झालं होतं. 29 वर्षिय अभिषेक कथावाचक, प्रवचनकार च्या आडून तरुण मुलींच लैंगिक शोषण करत होता. तो फोटोग्राफ आणि व्हिडिओ काढून मुलींना, महिलांना ब्लॅकमेल करायचा. सर्वसामान्य त्याच्या अध्यात्मिक चेहर्‍यावर विश्वास बसावा म्हणून अभिषेक मिश्राने ‘ अदीकरता नारायण दास’ असं नाव धारण केलं होतं. आयआयटी रुरकीमधून त्याने मॅकेनिकल इंजिनिअरची डिग्री घेतली होती.


दरम्यान, भोंदू अशोक मिश्रा त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधायचा. आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर तो मुलींना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क तोडायला लावायचा. नंतर त्यांचं शोषण करायचा. मथुरेतील त्याच्या घरी एकवेळ 24 तरुण मुलं आणि मुली एकत्र राहत होती. मुली- महिला त्याच्या प्रभावाखाली आल्यानंतर तो त्यांना गंधर्व विवाहाचा प्रस्ताव द्यायचा, लैंगिक शोषण करण्याची त्याची ही पद्धत होती. गंधर्व विवाह केल्यानंतर तो मुलींना प्रसादाच्या नावाखाली उत्तेजक मिसलेलं दूध प्यायला द्यायचा. नंतर लैंगिक कृतीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करायचा.


त्याच्या मोबाईलमध्ये अश्लिल फोटो, व्हिडिओ सापडले आहेत. पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अभिषेक मिश्रा त्याच्यासोबत राहणार्‍या कुटुंबाकडून पैसे उकळायचा. दुसर्‍या मुली त्याच्या सहवासात, सानिध्यात याव्यात यासाठी तो प्रयत्न करायचा. अटकेच्या सहामहिने आधी एका मुलीचं कुटुंब तिला नेण्यासाठी त्याच्या मथुरेतील घरी आलं होतं. त्यावेळी मिश्रा आणि त्याच्या सहकार्‍यांनी मोठा गोंधळ घातला होता. शिवाय अभिषेक मिश्रा ची आई सुरुवातीला त्याच्यासोबत रहायची, पण मुलाची ही कृत्य समजल्यांनतर ती तिथून निघून गेली. अधी तो भाड्याच्या घरात रहायचा नंतर त्याने स्वत:चं घर घेतलं. जे सुरुवातीला मिश्रा सोबत रहायला यायचे त्यांना त्याच्या वागणुकीवर संशय आल्यानंतर ते निघून जायचे, असं पोलिसांनी सांगितलं. त्याच्यासोबत निष्ठावान रहावं म्हणून तो सोबत येणार्‍यांचं ब्रेनवॉश करायचा. त्याने किती महिलांना टार्गेट करून त्याचं शोषण केलं, याचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments


bottom of page