संसदेत मोठा गोंधळ! पंतप्रधानांवर अंडे फेकले; सभागृहाचे कामकाज तहकुब
- Navnath Yewale
- Aug 9
- 1 min read

प्रिस्टिना/ कोसोवो : कोसोवाच्या संसदेत राजकीय तणावाचा भडका उडाला. विरोधी पक्षाच्या खासदार टाइम काद्रिजाज यांनी कार्यवाहक पंतप्रधान एल्बिन कुर्ती यांच्यावर अंडी फेकल्याने संसदेत एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकुब करावे लागले.
संसदेत कुर्ती यांच्यावर अंडी फेकण्यापूर्वी काद्रिजाज यांनी त्यांच्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली. त्यांनी कुर्ती यांना उद्देशून “ तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असे म्हणत अंडी फेकली. या प्रकारानंतर संसदेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कोसोवोमध्ये नवीन सरकार आणि संस्थांच्या स्थापनेवरून गेल्या काही काळापासून राजकीय गतिरोधक निर्माण झाला आहेश. कुर्ती विरोधी चर्चा करून सरकार स्थापनेसाठी तसेच राष्ट्रपती निवडणुकीसाठी आवश्यक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यसा चर्चेत अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
एल्बिन कुर्ती हे कोसोवोचे प्रमुख राजकारणी असून वेटेववेंडोसजे पक्षाचे नते आहेत. ते सध्या कार्यवाहक पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 7 जूनच्या संसदीय निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 120 पैकी 53 जागा मिळाल्य मात्र बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांना इतर पक्षांचा आणि जातीय अल्संख्याक खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
कोसोवोच्या संसदेत राष्ट्रती निवडण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. कुर्ती यांच्या पक्षाकडे एकट्याने हे संख्याबळ नसल्याने विरोधकांची भूमिका महत्वाची ठरत आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतरही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर सहमती होऊ शकलेली नाही. त्यातच संसद अध्यक्ष निवडीची घटनात्मक मुदतही संपल्याने संकट अधिक गडद झाले आहे.
गेल्या दोन वर्षाहून अधिक काळात कोसोवोमध्ये तीन निवडणुका आहेत. फेब्रूवारी 2025 मधील निवडणुकीनंतरही स्पष्ट बहुमताचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये कुर्ती यांच्या पक्षाने अल्पसंख्याक खासदारांच्या मदतीने बहुमत मिळवले होते. मात्र, जूनमधील निवडणूकीत पक्षाचा मतवाटा 51 टक्क्यांवरून 43 टक्क्यांपर्यंत राजकीय अस्थिरता वाढला आहे. अशातच पंतप्रधानांवर संसदेत अंडी फेकण्याच्या घटनेने या संकटाची तीव्रता पुन्हा समोर आली आहे.



Comments