16 तासांपासून ‘ धगधगती आग’; 44 हून अधिक जणांचा मृत्यू ,279 जण बेपत्ता !
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील वांग फुक कोर्ट निवासी संकुलात लागलेल्या आगीने संपूर्ण शहर हादरून टाकले आहे. ही आग 1945 नंतरची हाँगकाँगमधील सर्वात घातक आग असल्याचे सिद्ध होत आहे. आठ टॉवर असलेल्या या मोठ्या सोसायटीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि बाबूंच्या मचानामुळे आग वेगाने सात टॉवरमध्ये पसरली.
आतापर्यंत या भीषण अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचा दलाचा समावेश आहे, तर 272 लोक अजूनही बेपत्ता आहेत. पोलिसांनी निष्काळजीपणाबद्दल तीन जणांना अटक केली आहे आणि 16 तासांनंतरही अग्निशमन कार्य सुरू आहे.
माहितीनुसार, वांग फुक कोर्ट येथे नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि बाहेर बांबूच्या मचानावर हिरवी जाळी लावण्यात आली होती. दुपारी 3:00 वाजण्याच्या सुमारास दुपारी शॉर्ट सर्किट किंवा ठिणगीमुळे आग लागली. बांबू आणि प्लास्टिकसारख्या ज्वलनशील पदार्थामुळे आग 10 मिनिटांतच वेगाने पसरली. जोरदार वार्यामुळे आग आणखी भडकली आणि ती सात टॉवर्सपर्यंत वेगाने पसरली. उंच इमारती आणि पडणार्या मचानांमुळे बचाव कार्य अत्यंत कठीण झाले.
आगी इतक्या वेगाने पसरली की सुरुवातील ती पातळी 1 चा अलार्म होती.पंरतु संध्याकाळपर्यंत ती सर्वात गंभीर, पातळी 5 चा अलार्म म्हणून घोषित करावी लागली. आग विझवण्यासाठी 767 हून अधिक अग्निशमन दल, 128 वाहने आणि 57 रुग्णवाहीका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. परिस्थितीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश करण्यात मोठ्या अडचणी आल्या. बचाव कर्मचार्यांनी अनेक लोकांना वाचवले, परंतु पडणार्या मचान, अति उष्णता आणि धूर बचाव कार्यात महत्वाचे अडथळे आहोत.
या दुर्दैवी अपघातत 44 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. ज्यात एक धाडसी अग्निशमन दलाचा जवान आहे. सुमारे 279 लोक अजूनही बेपत्ता आहेत, ज्यात बहुतेक वृद्ध आणि लहान मुले आहेत. 45 हून अधिक जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक घरे राख झाली असल्याने बाधित रहिवाशांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले आहे. हे आकडे या दुर्घटनेची तीव्रता दर्शवतात.
हाँगकाँग पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे आणि तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये कंत्राटदार कंपनीचे दोन मालक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. त्यांच्यावर “ निष्काळजीपणे हत्या ” केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, दुरुस्तीच्या कामात अग्निरोधक साहित्य वापरले गेले नव्हते आणि मचानात स्वस्त प्लास्टिक वापरण्यात आले होते. ज्यामुळे आग वेगाने पसरली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.



Comments