NEET पेपरफुटी प्रकरण: शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात, आहिल्यानगरच्या एकाचा सहभाग
- Navnath Yewale
- May 13
- 1 min read

नाशिक/आहिल्यानगर : देशभरात खळबळ उडवून देणार्या नीट पेपरफूटी प्रकरणात नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित शुभम खैरनार याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबी) आपल्या ताब्यात घेत दिल्लीला रवाना झाले आहे.यामध्ये अहिल्यानगर येथील धनंजय नामक व्यक्तीचाही समावेश असल्याची माहिती आहे.
राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर सीबीआयच्या च्या सुचनेनूसार नाशिक गुन्हे शाखा -2 च्या पथकाने ही कारवाई केली होती. या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलीस सूंत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम खैरनार आणि अहिल्यानगर येथील तसेच सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या धनंजय नामक व्यक्तीने मिळून नीट चा पेपर लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,धनंजय याने हा पेपर शुभमला सुमारे 10 लाख रुपयांना विकला होता. त्यानंतर शुभमने टेलिग्रामच्या माध्यमातून तोच पेपर पुऐ तब्बल 15 लाख रुपयसांना विकल्याची माहिती समोर आली आहे.यासंपूर्ण प्रकरणात लाखो रुपयांचे आर्थिक़ व्यवहार झाल्याचा संशय असून त्याबाबतची माहिती स्वत: शुभमने चौकशीदरम्यान पोलीसांना दिल्याचे समजते. या रॅकेटमध्ये मोठी सखळी कार्यरत असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, यापूर्वीही शुभम आणि धनंजय यांनी नीट पेपर लीक केल्याचा संशय असून त्यावेळी ली झालेला पेपर मूळ प्रश्नपत्रिकेशी सुमारे 80 टक्के मिळताजुळता असल्याची माहितीही चौकशीतून समोर आली आहे. त्यामुळे या महत्वाच्याव राष्ट्रीय परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात शुभमचा याआधीपासून सहभाग असण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरणाचा तपास आता सीबीआय कडून गतीने सुरू असून पुढील चौकशीसाठी शुभम खैरनारला दिल्ली येथे नेण्यात आले आहे.



Comments