अॅड. प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.) वर टीका
- Navnath Yewale
- Aug 10
- 2 min read
राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत त्यांना मंत्री पदाचा दर्जा आहे त्यामुळे त्यांना कोण भेटतं याची नोंद रजिस्टरला असणारच, मी शरद पवारांचा दावा खोटा आहे असे म्हणार नाही,असे लोक मार्केटला भेटतात. पण राहुल गांधी यांच्या घराबाहेरच्या रजिस्टरला त्याची नोंद सापडण्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आपण निवडणूक आयोगाला वाढलेल्या 76 लाख मतदानासंदर्भात तुमच्याकडे कागदपत्रे नाही तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणू फ्री आणि फेअर वातावरणात कशी झाली, हे आपण सर्वजन एकत्र जाऊन विचारू, असे मी सर्व पक्षांना पत्र लिहिलं होतं. पण त्यावेळी आमच्यासोबत कोणी आल नाही असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत 160 जागा जिंकून ेदण्याचा दावा करणार्या दोन व्यक्तींना घेऊन मी राहुल गांधी यांना भेटायला गेलो होतो. पण, त्या दोन व्यक्तींची नावे आठवत नाहीत, हा शरद पवारांचा दावा वंचित बहुज आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी खोडून कढला आहे. किती खोटं बालावं, याला एक सीमा आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांना भेटायला येणार्यांची नोंद ठेवली जाते, त्यामुळे त्या दिवशीची नोंद पाहिल्यास त्या दोघांची नावे कळू शकतात, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दोन व्यक्ती मला भेटायला आल्या होत्या, त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची हमी दिली होती. असे विधान शरद पवार यांनी शनिवारी (9 ऑगस्ट) नागपूरात केले होते. ते करताना त्यांनी त्या दोघांची नावे आठवत नसल्याचे म्हटले होते. त्यावरून आंबेडकर यांनी पवारांवर टीकास्त्र सेाडले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना मंत्र्यांचा दर्जा असून त्याच प्रकारची सुरक्षा त्यांना असते. त्यांच्याकडे कोण येतं आणि कोण जातं, याची नांदे ठेवली जाते. शरद पवार यांचा दर्जा पाहता त्यांची नोंद होणार नाही, याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यांना भेटण्यासाठी मुभा असते. पण, त्यांच्यासोबत असलेल्या दोघांची नोंद राहुल गांधींच्या घराबाहेर असलेल्यात्या रजिस्टरमध्ये आहे.
त्यादिवसाचं राजिस्टर काढलं, तर शरद पवारांसोबत आलेल्या दोन व्यक्तींची नावं जाहिर केली जाऊ शकतात. तुम्ही सामान्य माणसाला फसवू शकता. पण, राजकीय कार्यकर्त्यांना फसवू शकत नाही,असा टोला आंबेडकर यांनी पवारांना लगावला.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, शरद पवार यांनी केलेला दावा मी खोटा म्हणणार नाही. कारण बाजारात अशी लोकं आहेत, जी ऑफर देतात. शरद पवार आणि राहुल गांधी यांनी हे त्यावेळीच पोलिसांना सांगितलं असतं तर त्या दोन जणांमार्फत हे शक्य आहे का? ही परिस्थिती पाहिली पाहिजे.
निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. त्याला शरद पवार यांनीही पुष्टी दिली होती. त्याबाबत आंबेडकरांनी या दोन्ही पक्षावर खरपूस शब्दांत टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मतचोरीची तक्रार म्हणजे वरातीमागून घोडे आहेत.
मतचोरीच्या प्रकरणात आम्ही त्यांना म्हणालो होतो की, आपण सर्वजन मिळून न्यायालयात जाऊ. पण, त्यावेळी आमच्यासोबत कोणीच आलं नाही. न्यायालयाच्या माध्यमातून दुध का दुध आणि पानी का पानी होऊ शकतं दुर्दैवाने त्या वेळी ते न्यायालयात गेले नाहीत. पण, आता बोबलत बसले आहेत, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.


Comments