top of page

अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची बंडल मोजतानाचा व्हिडीओ

ree

छत्रपती संभाजीनगर : ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्क फोडला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटोच आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे रजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


आंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


याबाबत अंबादास दानवे म्हणाले की सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. मोठ्या नोटांच्या गड्या त्यात दिसून येत आहेत. कोणाच्या आहेत, काय आहेत हे तपासले पाहिजे. मी याबाबत तक्रार करणार आहे. मी योत कोणाचं नाव घेत नाही पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे असंही दानवे म्हणाले.


त्यात कोण आमदार? : शिंवसेना गटाचे मंत्री भरत गोगावले म्हणाले की, त्यात आमदार कोण आहे आणि किती बंडलं आहेत, हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाही. आंबादास यांच्याकडे काही शोध मोहिम आहे का? आम्ही सत्ताधारी आहोत. तीन पक्षांमधील कोण आमदार आहे? हे कसले पैसे आहेत? हे तरी कळायला हवे. ते अनेक वेळेला तक्रार करतात. परंतु वस्तुस्थिती काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. आंबादास दानवे यांच्याकडे सध्या कुठलेही पद नाही. त्यामुळे कदाचित त्यांची शोध महिम सुरू असेल असंही मंत्री भरत गोगावले म्हणाले.


आमदार महेंद्र दळवींची टीका: महेंद्र दळवी यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवेंनी तो व्हिडीओ नीट दाखवावा. लाल टी-शर्टमधील व्यक्ती कोण, हे त्यांनी सांगावे. मी व्हिडीओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांच्याकउे कोणतं काम नाही, पद नाही पक्षात त्यांना कोणी कुत्र विचारत नाही. या व्हिडीओशी माझा काहीही संबंध नाही. अंबादास दानवे यांनी तो व्हिडीओ समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यासकट दाखवावा. त्यांनी व्हिडीओ कट करून दाखवू नये. अंबादास दानवे यांन पुरावे घेऊन हा व्हिडीओ माझाच आहे, हे सिद्ध करुन दाखवावे. अंबादास दानवेंनी व्हिडीओ मॉर्फ केला आहे. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे सुपारीबाज नेता आहे, अशी टीका महेंद्र दळवी यांना अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे.

Comments


bottom of page