अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएचा प्रथमिक अहवाल प्रसिद्ध; दुर्घटनेपूर्वी विमान झाडाला धडकले, अंतिम अहवालास वेळ लागणार !
- Navnath Yewale
- Feb 28
- 2 min read

मुंबई : उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासमवेत एकून पाच जणांना या भीषण अपघातात जीव गमवावा लागला. या घटनेला आज एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. अजित पवार यांचा अपघात कि घातपात यावर शंका उपस्थित करत रोहित पवार, आमोल मिटकरी यांचा घटनेचा सखोल आणि निष्पक्षपाती तपासाठी पाठपुरवा सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत डीजीसीएचा प्रथामिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्रथमिक अहवाल डिजीसीएने आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. अजित पवारांच्या विमानाचा 22 पानांचा प्राथमिक प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये विमान कोसळताना आधी झाडावर धडकल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट संदर्भात कुठलीही माहिती नाही. या अहवालात केवळ प्राथमिक माहिती आहे. मात्र, अंतिम अहवाल यायला वेळ लागणार आहे.
दरम्यान, अपघातावेळी 2 हजार मिळर इतकी दृष्यमानता होती. तर फ्लाईट डाटा रेकॉर्डन उष्णतेमुळे खराब झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स, कॉकपीट तपासण्यासाठी अमेरिकन कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे., कॉकपीट हाताळण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे. अपघातामुळे विमानांमध्ये असणारा कॉकपीट आणि एफडीआर डॅमेज झाला होता. त्यातील डाटा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे. ज्या कंपनीने हा ब्लॅक बॉक्स बनवला आहे त्या अमेरिकन कंपनीची मदत घेतली जाणार आहे. हा रिपोर्ट अपघाताच्या कारणांची प्राथमिक माहिती देणारा आहे.
अहवालामध्ये हे नमूद आहे :
अहवालानुसार , विमानाने प्रथम एका झाडाला धडक दिली आणि त्यानंतर ते जमीनीवर खाली कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे 2 हजार मीटर इतकी होती.विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) उष्णतेमुळे खराब झाल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र उपलब्ध यंत्रणांमधून रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. त्यामुळे काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सबंधित अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून अंतिम निष्कार्षांसाठी पुढील तपास सुरू असल्याची महिती यामध्ये देण्यात आली आहे.



Comments