अनगर नगरपंचायत: उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; राजन पाटलांच्या सूनबाईच बिनविरोध नगराध्यक्षा
- Navnath Yewale
- Nov 18
- 2 min read

सोलापुर/मोहोळ: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (दि.18) झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिी आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संचिन मुळीक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला होता.
उज्ज्वला थिटे यांच उमेदवारीमुळे 17 नगरसेवक बिनविरोध होऊनही अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणुक लागली होती. नगराध्यक्षपदासाठी केवळ तीनच अर्ज आलेले आहेत. त्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचा भारतीय जनता पक्षाकडून तर सरस्वती शिंदे यांनी पक्ष अर्ज भरला आहे. तीसरा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या थिटे यांचा होता.
अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अवघे तीन अर्ज येऊनही प्रशासनाकडून दुपारी साडेतीनपर्यंत छाननीचे काम चालूच होते. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान, उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे दुसर्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे ह्या निवडणुकीतून माघार घेणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनेची बिनविरोध वर्णी लागली आहे. महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 आणि नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीच्या अधिनियमानुसार अर्जाची चौकशी केली. त्यात उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद असल्याचे आढळून आले. असंही मुळीक म्हणाले.
छाननीमध्ये अर्ज बाद झाल्या नंतर राजन पाटील समर्थकांनी मोठा जल्लोष केला. माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज करत ‘ अजित पवार, अनगरकरांचा नाद करायचा नाही ’ असं चॅलेंजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं. तर दूसरीकडे सुचकाच्या सह्या राहूच शकत नाही. माझा मुलगा सूचक आहे आणि तो दिवभर माझ्यासोबत होता. त्यामुळे मी कार्टाची पायरी चढणार असल्याचे उज्ज्वला थिेटे म्हणाल्या.



Comments