top of page

अमेरिकेचा 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला; डोनाल्ड ट्रम्पच्या इशार्‍याने जगाची झोप उडाली

Mar 26
1 min read

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सध्यातरी थांबलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सैन्याला पाच दिवसांसाठी इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करू नये , असा आदेश दिलेला आहे. दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामासाठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने पाठवलेला 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. उलट इराणनेच अमेरिकेसमोर 5 कलमी प्रस्ताव ठेवला आहे. युद्धात झालेल्या नुसकानीची भरपाइृ द्यावी तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आम्हाला सार्वभौमत्व हवे आहे, अशीही मागणी इराणने अमेरिकेला केली आहे. दरम्यान आता इराणने आपला प्रस्ताव फेटाळल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापेल आहेत. त्यांनी हराणला गंभीर इशारा दिला आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची भूमीका सांगितली आहे. त्यांनी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणने चर्चेला गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. “ आमच्यासोबत करार करा अशी भीक इराणकउून मागितली जात आहे. सध्या अमेरिकेचं लष्कर पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आहे. त्यांनी लवकरात लवकर गांभीर्याने वागायला हवे. कारण एकदा उशीर झाल्यावर नंतर मागे वळून पाहणे खूप कठीण होईल. मागे येण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही” असा रोखठोक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.


दरम्यान, अमेरिकेलने दिलेला 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. याउलट इराणनेच अमेरिकेला पाच कलमी प्रस्ताव पाठवला आहे. आम्हाल होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत सर्वाभौमत्व हवे आहे. युद्धामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम तसेच प्रादेशिक सशस्त्र गटांना आमच्याकडून दिले जाणारे समर्थन यावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे पाच कलमी प्रस्तावात नमूद आहे. युद्धसमाप्तीची वेळ आम्हीच ठरवू असेही इराणकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशार्‍यानंतर इराण नेमकी काय भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page