आम्ही ब्रँडचा बँड वाजवला, मुंबईत महायुतीचा महापौर बसवल्याशिवाय घरी परतणार नाही- मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- Sep 16
- 2 min read

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा विजय संकल्प मेळाव्यात ठाकरे बंधु उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बोलाताना त्यांनी शविसेनेच्या भूतकाळातील विश्वासघाताचा बडेजाव केला. आणि महायुतीचा महापौर मुंबईत बसलवण्याचा निर्धार केला. मेळाव्यात फडणवीसांनी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आठवण करून दिली अणि मुंबईची मालकी महायुतीची असल्याचे सांगितले. फडणवीसांच्या या भाषणामुळे मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीतर्फे विजयाचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही अप्रत्यक्ष टीका केली. मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणांनी प्रतिसाद दिला.
रडणारे नाही, लढणारे आहोत: फडणवीस म्हणाले की, आपण रडणारे नाही तर लढणारे आहोत. शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. महाराजांनी किल्ले गमावले तरी परत मिळवले, त्याप्रमाणे 2022 मध्ये गनिमी काव्याने आणि 2024 मध्ये बहुमताने सगळे परत मिळवले ठाकरेंनी ओरबाडले, पण आता महायुतीचा महापौर मुंबईत बसवल्याशिवाय घरी जाणार नाही. कुणी सोबत आले तरी चालेल. पण हे रेकॉर्ड करा, असे फडणवीस म्हणाले.
बाळासाहेबांचा वारसा शिंदेकडे : काही जण हसतात, पण बेस्ट निवडणुकीत शशांक राव आणि लाड,दरेकर यांनी शिवसेनेच्या ब्रँडचा बँड वाजवला. बाळासाहेब ठाकरे हेच ब्रँड होते. तुम्ही ब्रँड नाही. लोढा किंवा शेलार नंतर त्यांची मुलं नाही, तर अमित साटम अध्यक्ष झाले. आम्हाला कुणी ब्रँड सांगू नये. जगातील सर्वात मोठा ब्रँड नरेंद्र मोदी हा आमच्याकडे आहे. काही उचक्के मोदींना विचारतात, पण मुंबईकरांनी 2024 मध्ये उत्तर दिले- मुंबई भाजपची, महायुतीची! असेही ते पुढे म्हणाले.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आहेत. त्यांची दहा भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा. गिरणगावातील मराठी माणूस कुठे गेला याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. बीडीडी चाळीला देवाभाऊंनी विकसित करून 120 फूट उंचीवरील माणसांना 500 फूट उंचीत नेल्याचेही फडणवीस म्हणाले. गेल्या दहा वर्षात आम्ही मुंबईत केलेले इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बंगलोर नाही, तर मुंबईत आता जगातील सर्वात मोठे स्टार्टअप हब बनले आहे. मुंबईतील प्रकल्पांची संकल्पना माझी नाही, पण 30-40 वर्षात ते लोक प्रकल्प हाती घेऊ शकले नाहीत. निवडणुकीत पाणी पाजायचे म्हणून मी पाणी प्यालो, असा उपरोधक टोला मारत त्यांनी विकासाच्या कामांचा उल्लेख केला.



Comments