इंडिया आघाडीचा मोर्चा आडवला, बॅरिकेट टाकले, खासदारांना धक्काबुक्की !
- Navnath Yewale
- Aug 11
- 1 min read
राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात; मार्चात शरद पवार, कल्लकार्जुन खर्गे, अखिलेश यादव यांच्यासह 300 खासदारांचा सहभाग

‘मत चोरी’ च्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या दिशेने निघाला होता. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या अलिकडेच पोलिसांनी बॅरिकेट्स टाकून हा मोर्चा आडवला. खासदार अखिलेश यादव आणि काही खासदारांनी बॅरिकेड ओलांडून पुढे गेले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन सहभाग खासदारांसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी मोर्चा आडवत असताना खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांना मोठ्या गाडीतून पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राहुल गांधी मत चोरीच्या मुद्यावर प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
राहुल गांधी म्हणाले, वास्तव हे आहे की ते चचाृ करू शकत नाहीत. कारण खरं काय ते देशाच्या समोर आले. ही जी लढाई आहे ती राजकीय नाही ही संविधानाची लढाई आहे. संविधान वाचवण्याची लढाई, एक व्यक्ती एक मताची लढाई आहे. त्यासाठी आम्हाला स्वच्छ आणि ओरीजनल मतदानयादी हवी आहे.
पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, संजय राऊत, सागरिका घोष आणि इतरांना खासदारांना ताब्यात घेत पोलिस ठाण्याकडे नेले. दिल्लीचे पोलिस आयुक्त दिपक पुरोहित यांनी सांगितले की,विना परवानगी हा मोर्चा काढण्यात आला होता. खासदारांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर कारवाई होणार आहे.


Comments