top of page

इंडिया आघाडीचा मोर्चा निवडणूक अयोगाच्या मुख्यालयावर धडकणार!

राहुल गांधीच्या मतचोरी आरोपानंतर इंडिया आघाडी आक्रमक; महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) चे राज्यभर आंदोलन


ree


लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे निवडणुक आयोग सध्या आरोपीच्या पिंजर्‍यात आहे. राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत कशी मतचोरी झाली हे पुराव्याने आणि आकडेवारीने दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमिवर (11 ऑगस्ट) इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहे.



महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे. महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसेच आमदारांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करून कलंकित मंत्री आणि आमदारांवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाणार आहे. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी दिल्लीसह महाराष्ट्र धडक मोर्चामुळे दुमदुमून जाणार आहे.


नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवास्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची 7 ऑगस्ट रेाजी बैठक झाली. यावेळी कर्नाटकसह मराहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांचा घोटाळा झाल्याची चर्चा करण्यात आली. या निमित्ताने काँग्रेसने मतचोरी आरोपावर सखोल अभ्यास करून मतचोरीचा घोटाळा कसा झाला, याची आकडेवारी सादर केली. याचे प्रेझेंटेशन आणि पत्रकार परिषद राहुल गांधी यांनी घेतली. त्यामुळे निवडणूक अयोग बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे.


त्यानंतर आयोगावर झालेल्या आरोपांना भाजपकडून उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आरोप आयोगावर मग उत्तरे भाजपकडून का? असा सवाल इंडिया आघाडीकडून करण्यात आला. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, लोकसभेत शपथ घेतली आहे त्यामुळे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.


दिल्लीत इंडिया आघाडी निवडणूक आयोग कार्यालयावर धडकणार आहे तर महाराष्ट्रात ठाकरे गट सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहे. सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप तसेच वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या मंत्र्यांना घरी बसवा या मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन केले जाणार आहे.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page