इराणने अमेरिकेचा 48 तासांत बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळइराणकडून तीन जहाज जप्त
- Navnath Yewale
- 22 hours ago
- 2 min read

इराणने अवघ्या 48 तासानंतर होर्मुझमध्ये त्याच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणनच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड ने अमेरिका आणि इस्त्रायलशी संबंधीत तीन जहाजांवर हल्ला करून त्यांना ताब्यात घेतले आहे. इराणच्या माध्यमांनूसार एका जहाजावर ग्रीक, एकावर लायबेरिया आणि एकावर पनामाचा झेंडा लावला होता. इराणचे म्हणणे आहे की या जहाजांनी होर्मुझच्या नियमांचे उल्लंघन केले होते म्हणून त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.
याआधी रविवार दि.20 एप्रिल रोजी इराणच्या एका जहाजावर अमेरिकन सैन्याने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने यसा जहाजाला जप्त केले होते. अमेरिकन मीडियाच्या बातमीनुसार जहाजावर चीनवरून मिसाईल बनवण्याचे सामान लादले होेते. सेंटकॉमने या जहाजाला अजूनही आपल्या ताब्यात ठेवले आहे.
दरम्यान, मरीन ट्रॅफिकच्या मते इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने नौकेद्वारे ओमानच्या जवळ दोन जहाजांना घेरले. या जहाजांवर आधी फायरिंग करण्यात आली आणि नंतर त्यांना ताब्यात घेतले गेले. यानंतरा होर्मुझच्या जवळ ग्रीकच्या एका आणखी जहाजाला इराणने जप्त करीत ताब्यात घेतले आहे.
या जहाजांवर कोणता माल लादला होता या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सरकारी निवेदनात या जहाजांचे कनेक्शन ज्यू सरकारशी जोडण्यात आले आहे. ज्या जहाजांना इराणने ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे एमएससी - फ्रांन्सेसका आणि इपॅमिनोडस् आहे. तिसर्या जहाजाच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाही.
इराणने बुधवारी (दि.22) संसदेत 12 मुद्यांचा प्लान सादर केला आहे. या प्लानवर संसदेची मोहर लागताच तो आमलात आणण्याचे सांगण्यात आले आहे. या अंतर्गत होर्मुझ मध्ये कोणत्याही इस्त्रायली जहाजाला प्रवेश दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांचे मित्र देशाच्या जहाजावर देखील इराणन ऍक्शन घेणार असे म्हटले आहे. इराणचे म्हणणे आहे की जो पण देश फारसची खाडीच्या अस्तित्वाला मानणार नाही त्याच्या जहाजांना देखील होर्मुझ पार करू दिले जाणार नाही. इराणने होर्मुझमध्ये इराणी रियालद्वारा टोल घेण्याचाही इरादा व्यक्त केला आहे.
इराणच्या संसदेत सादर केलेल्या बिलाच्या मते जो कोणी होर्मुझच्या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्या जहाजांना आधी जप्त केले जाईल. त्यानंतर त्यावरील मालाच्या किंमतीच्या 20 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाईल.



Comments