top of page

...उलट्या बोंबा, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी यूपीएससीकडे महिला आयपीएस अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी

ree

सोलापूरच्या महिला पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अवैध मुरुम उत्खननाविरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवार देत असल्याचा अरोप आहे. मात्र, अंजली कृष्णा यांनी माझ्या फोनवर कॉल करा, असं स्पष्टपणे सांगितलं.


अंजली कृष्णा यांच्या या भूमिकेचं सोशल मिडियावर कौतुक होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांच्या विरेाधात भूमिका घेताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी थेट यूपीएससीला पत्र पाठवून कृष्णा यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


अमोल मिटकरी यांच्या या भूमिकेनंतर ज्येष्ठ समाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या ‘ एक्स’ अकाऊंटवरून पोस्ट करत ‘ हा काय फालतूपणा आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.


अंजली दमानिया म्हणाल्या, हा काय फालतू पणा आहे?

अमोल मिटकरींनी त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, की स्वत:चे डोकं वापरले? अंजला कृष्णाची चौकशी? का? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून? चौकशी त्या अजित पवाराची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या कब्जात आहेत, त्याच्या चौकशा झाल्या पाहिजे.. ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत. त्या आयपीएस ऑफिसरला जराही छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कार्टात खेचेन आयपीएस ऑफिसर्सच्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे.

Comments


bottom of page