top of page

एसआयआरमुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालात 207 जागांसह भाजपने दणदणीत बहुमत संपादन केले आहे. तर 15 वर्षांपासून सत्तास्थानी असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्ष थेट 80 जगांवर फेकला गेला आहे. या सत्ताबदलामागे भाजपच्या राजकीय रणनीतीसोबतच एसआयआर प्रक्रियेमध्ये 34 लाख 35 हजार मतदारांचे विचारात न घेतलेले अपील निर्णायक ठरल्याची चर्चा आहे.


पश्चिम बंगालमध्ये लोकसभा-2024 निवडणुकीत राज्यातील एकूण मतदारांची संख्या 7 कोटी 60 लाख 10 हजार होती, तर 2021 च्या विधानसीा निवडणुकीत एकूण मतदारांचा आकडा सात कोटी 34 लाख 14 हजार 746 इतका होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणुक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रिया राबवली.


‘एसआयआर’ एकूण मतदारांची संख्या 6 कोटी 75 लाख होती. म्हणजेच ‘ एसआयआर’ अंती मतदारायाद्यांमधून तब्बल 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. या वगळलेल्यांपैकी एकूण 34 लाख 35 हजार प्रभावित मतदरांनी अपील दाखल केले. मात्र निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात हे अपिल फेटाळण्यात आले.


दोन्ही ठिकाणी अपिल फेटाळण्यात आल्यामुळे या 34 लाख 35 हजार मतदारांना मतदान करताच आले नाही. आता निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या दोन्ही पक्षांना मिळालेल्या एकूण मतांमधील फरक 32 लाख 11 हजार 427 इतका राहिला आहे. त्याचाच फटका तृणमूल काँग्रेसला बसल्याची चर्चा आहे.


मागील निवडणुकांमधील आकडेवारी: 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 34 जागा जिंकताना 39.77 टक्के मते मिळविली होती. 2016 च्या विधानसभेत 211 च्या विधानसभेत 213 जागा आणि 47.94 टक्के मते, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 29 जागा आणि 46.16 टक्के मते मिळविली होती, 2026 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र 80 जागा जिंकताना तृणमूल काँग्रेसचा आलेख 40.80 टक्के मतांवर गडगडला आहे.


दुसरीकडे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2 जागाने जिंकत 17.02 टक्के मते मिळविली होती. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 3 जागा आणि 10.16 टक्के मते, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा आणि 40.25 टक्के मते, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 77 जागा आणि 38.14 टक्के मते, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 12 जागा आणि 38.73 टक्के मते मिळवून‘ एसआयआर’ प्रक्रिया राबविली जाण्यापूर्वी आपल्या कामगिरीत चढत्या कमानीने सातत्य राखले होते.


मात्र, या पाचही निवडणुकांमध्ये भाजपला तृणमूल काँग्रेसला मागे टाकणे शक्य झाले नव्हते. ते उद्दिष्ट 2026 सहाव्या प्रयत्नात भाजपने साध्य केले आहे. 2026 विधानसभा निवडणुकीत भाजपला 2 कोटी 92 लाख 24 हजार 804 मते तर तृणमूल काँग्रेसला 2 कोटी 60 लाख 13 हजार 377 मते मिळाली आहेत.

Comments


bottom of page