कॉक्रोच जनता पार्टीकडून मोदी सरकारविरोधात दिल्लीत पहिल्या आंदेालनाची घोषणा , सोशलमीडियावरुन देशभरातील युवकांना सहभागी होण्याची अवाहन; अभिजीत दिपके उपस्थितीत राहणार

सोशल मिडियात तरुणाईचे आकर्षण ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधात पहिल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेत असलेले पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके ही भारतात परतणार असून या आदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी देशभरातील पार्टीच्या सदस्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह जगभरात कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. या डिजिटल पार्टीचे सोशल मीडियात कोट्यवधी फॅालोवर्स आहेत. सोमवारी दिपके यांनी सोशल मीडियातून आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
अभिजीत दिपके भारतात येणार : अभिजित दिपके हे स्वत: या आदोलनात सहभागी होणार आहेत. ते 6 जूनला थेट दिल्ली विमानतळावरुन आंदोलनाच्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती खुद्द त्यांनी दिली. त्यांनी सोशल मीडियात याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिल्ली विमानतळावर मी 6 जूनला येणार असून तिथून थेट पोलीस ठाण्यात जाणार आहे.
पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी घेतली जाईल.देशातील युवकांनी जंतरमंतरवर शांततामय आंदोलनात सहभागी होण्यासाठी यावे, अशी विनंती दिपके यांनी केली आहे. कोट्यवधी विद्यार्थ्यांना फटका बसला असून सरकारने याची जबाबदारी घ्यायला हावी, असंं दिपके म्हणाले. दिल्लीत आल्यानंतर आपल्याला अटकही होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, दिपके यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यावर आता उलटसूलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी ही पार्टी अस्तीत्वात आल्यानंतर केवळ डिजिटल स्वरुपातच काम सुरू राहणार का, असा सवाल केला होता. आता या घोषणेचे अनेकांनी स्वागत केले आहे. तर त्यावरुन टीकाही होऊ लागली आहे. काहींनी त्याला स्टंट म्हटले आहे तर काहींनी त्याचा ड्रामा असा उल्लेख केला आहे.



Comments